शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 7:51 PM

Coromandel Express Derail: कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Hardeep Singh Puri : ओडिशातील बालासोरमध्ये कोरोमंडल ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विरोधकांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावरुन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पुरी यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. 

सोमवारी(5 जून) माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की, "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर NSG ला मुंबईत पोहोचण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. ट्रेन दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी तात्काळ बालासोर ट्रेन अपघात स्थळाला भेट दिली. तीन केंद्रीय मंत्री देखील होते. अपघातानंतर 51 तासांत रेल्वे रुळ पूर्ववत करण्यात आला."

विरोधी पक्षांच्या बैठकीवरुन हरदीप सिंग पुरी यांनी टीका केली. ते म्हणाले, "आम्हाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे, पण ही वेगळ्या प्रकारची विरोधी एकजूट होत आहे. यापैकी अर्धे ते आहेत, ज्यांना नेतृत्व हवंय आणि अर्धे ते आहेत जे कोणाच्यातरी विरोधात आहेत," अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

ओडिशा रेल्वे अपघातात 275 ठारओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि काही जखमींची रुग्णालयात जाऊनही भेट घेतली. यासोबतच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. 

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीया अपघातानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेपासून भाजप पळू शकत नाही. भाजपने याची जबाबदारी घ्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात व्यस्त आहेत, पण रेल्वे सुरक्षेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा