Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. या अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगर येथे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी तीन वेगवेगळ्या रुळांवर आदळल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही मार्ग बदलण्यात आले.
हावडाहून जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहणागबाजार येथे रुळावरून घसरले आणि अप मार्गावर पडले, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. "हे रुळावरून घसरलेले डबे १२८४१ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि त्याचे डबेही उलटले आहेत.
ओडिशा रेल्वे अपघातानंतर रद्द झालेल्या गाड्यांची यादी
१२८३७ हावडा -पुरी एक्सप्रेस१२८६३ हावडा-सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल एक्सप्रेस१२८३९ हावडा-चेन्नई मेल१२८९५ शालीमार - पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस२०८३१ शालीमार-संबळपूर एक्सप्रेस०२८३७ संत्रागाछी - पुरी स्पेशल२२२०१ सियालदह - पुरी दुरांतो एक्सप्रेस०८४११ बालासोर - भुवनेश्वर स्पेशल०८४१५ जलेश्वर - पुरी स्पेशल१२८९१ बंगारीपोसी पुरी एक्सप्रेस१८०२१ खरगपूर-खुर्दा रोड एक्सप्रेस०८०६३ खरगपूर - भद्रक स्पेशल२२८९५ हावडा-पुरी एक्सप्रेस१२७०३ हावडा-सिकंदराबाद एक्सप्रेस१२८२१ शालीमार - पुरी एक्सप्रेस१२२४५ हावडा-सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल एक्सप्रेस०८०३१ बालासोर - भद्रक स्पेशल18045 शालीमार - हैदराबाद ईस्ट कोस्ट एक्सप्रेस20889 हावडा-तिरुपती एक्सप्रेस18044 भद्रक-हावडा एक्सप्रेस18038 जाजपूर केओंझार रोड-खड़गपूर एक्सप्रेस१२०७३ हावडा-भुवनेश्वर एक्सप्रेस१२०७४ भुवनेश्वर - हावडा एक्सप्रेस१२२७७ हावडा-पुरी शताब्दी एक्सप्रेस१२०७८ पुरी-हावडा शताब्दी एक्सप्रेस08032 भद्रक - बालासोर स्पेशल08032 भद्रक - बालासोर स्पेशल१२८२२ पुरी-शालीमार एक्सप्रेस12815 पुरी-आनंद विहार एक्सप्रेस08064 भद्रक - खरगपूर स्पेशल22896 पुरी - हावडा वंदे भारत एक्सप्रेस०८४१६ पुरी-जलेश्वर स्पेशल08439 पुरी-पाटणा स्पेशल
या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
१२८०१ पुरी - नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेस पुरीमार्गे जाखापुरा आणि जरोली मार्गे धावेल.
२ जून १८४७७ रोजी पुरीहून पुरी-ऋषिकेश कलिंग उत्कल एक्स्प्रेस अंगुल-संबलपूर सिटी-झारसुगुडा रोड-आयबी मार्गे धावेल.
२ जून 03229 रोजी पुरीहून पुरी-पाटणा स्पेशल जाखापुरा-जरोली मार्गे धावेल.12840 चेन्नई-हावडा मेल चेन्नईहून जाखापुरा-जरोली मार्गे निघेल.18048 वास्को द गामा - हावडा अमरावती एक्स्प्रेस वास्कोहून जाखापुरा - जरोली मार्गे सुटेल.22850 सिकंदराबाद - शालीमार एक्स्प्रेस जाखापुरा आणि जरोली मार्गे सिकंदराबादहून सुटेल.22804 संबलपूर-शालीमार एक्सप्रेस संबलपूरहून संबलपूर शहर-झारसुगुडा मार्गे धावेल.12509 बेंगळुरू-गुवाहाटी एक्स्प्रेस विजयनगरम-तिटीलागड-झारसुगुडा-टाटा मार्गे धावेल.१५९२९ तांबरम - नवीन तिनसुकिया एक्स्प्रेस तांबरमहून रानीताल-जरोली मार्गे धावेल.22807 संत्रागाछी - चेन्नई एक्स्प्रेस हा प्रवास टाटानगर मार्गे धावेल.22873 दिघा-विशाखापट्टणम एक्स्प्रेस टाटानगर मार्गे धावेल.१८४०९ शालीमार - पुरी श्री जगन्नाथ एक्स्प्रेस टाटानगर मार्गे धावेल.22817 हावडा-म्हैसूर एक्स्प्रेस टाटानगर मार्गे धावेल.