शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

Odisha Train Accident: 'तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'; राहुल गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 7:25 PM

Odisha Train Accident: ओडिशात झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधत सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.

Rahul Gandhi On Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला यासाटी जबाबदार धरले आहे. यातच आता काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

"270 हून अधिक मृत्यू झाल्यानंतरही कोणी जबाबदारी घेतली नाही. मोदी सरकार अशा वेदनादायक अपघाताच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांना घेरले. "भयानक रेल्वे अपघाताला 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वोच्च पदांवर बसलेल्या लोकांची जबाबदारी मानवतावादी आणि नैतिक आधारावर ठरवायला नको का? रेल्वेतील रिक्त पदे आणि महत्त्वाच्या क्षेत्रात निधीची कमतरता यासाठी कोणाला जबाबदार धरणार?लालबहादूर शास्त्री, नितीशकुमार, माधवराव सिंधिया यांच्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको का ? " असे प्रियंका म्हणाल्या.

गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीयाआधी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांच्या ‘प्रचार मोहिमे’मुळे रेल्वेच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, "'नोव्हेंबर 1956 मध्ये अरियालूर ट्रेन दुर्घटनेनंतर लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता आणि ऑगस्ट 1999 मध्ये गॅसेल ट्रेन दुर्घटनेनंतर नितीश कुमार यांनीही तेच केले होते. आता पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा राजीनामा घेणार का?"

LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

अपघाताचे कारण काय?इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदल हे या रेल्वे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. अपघाताचे कारण सिग्नलसाठी आवश्यक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमशी संबंधित असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनीही सिग्नलमध्ये अडचण आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले आहे.

रेल्वेकडून 10लाख मदतमृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी