लातूर : शहरातील एका देशी दारू दुकानदाराचे सेल्फ चेकने घेतलेल्या मालापेक्षा जास्तीचे पैसे एकाने घेवून ट्रेडर्सकडे जमा न करता स्वत:कडे घेवून ४१ लाख ३७ हजार ४८१ रूपये रक्कमेचा अपहार केला तसेच फसवणुक केली असल्याची घटना घडली़ या प्रकरणी शिवाजी सौदागर रा़हत्तेनगर कॉर्नर यांच्या फिर्यादीवरून दिलीप शंकर वाघमारे यांच्यासह अन्य तीघांजणाविरूध्द गांधीचौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़टिप्परची चोरीलातूर: शहरातील खाडगाव रिंगरोड परीसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला एम़एच़१५ डी़जे़११८७ हा टिप्पर चोरून अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सज्जन महमद शेख रा़गिरवलकर नगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द एमआयडीसी पोलीसात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अपहारप्रकरणी गुन्हा
By admin | Published: September 03, 2015 9:44 PM