सुीच्या दिवशी सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालय
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM
जळगाव- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार १ एप्रिल पासून सुधारित बाजार मूल्यदर तक्ते लागू होणार आहेत. तसेच २४ ते २७ मार्च या कालावधित शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणार्या पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून २५ व २६ मार्च रोजी सार्वजनिक सुी असली तरी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्ग १ जळगाव यांनी कळविले आहे.
जळगाव- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार १ एप्रिल पासून सुधारित बाजार मूल्यदर तक्ते लागू होणार आहेत. तसेच २४ ते २७ मार्च या कालावधित शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणार्या पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून २५ व २६ मार्च रोजी सार्वजनिक सुी असली तरी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्ग १ जळगाव यांनी कळविले आहे.पर्यवेक्षकीय कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण सत्र जळगाव - पर्यवेक्षकीय प्रशिक्षण सत्र ११ एप्रिल ते ३० जून या कालावधित महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक येथे वर्ग घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र लेखा लिपीक परीक्षा उत्तीर्ण यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्र. ८८ हे ११ एप्रिल ते १७ जून या कालावधित होणार आहे. इच्छुक कर्मचार्यांनी आवेदनपत्रे ५ एप्रिल पर्यंत सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक या कार्यालयाकडे पाठवावी. माजी सैनिकांसाठी पेन्शन अदालतजळगाव - जिल्ातील निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक, विधवा, युध्द विधवा, वीर माता, वीर पिता यांच्यासाठी ७ व ८ एप्रिल रोजी धन्वंतरी ऑडिटोरीयम, एएफएमसी पुणे येथे व ९ एप्रिल रोजी सैनिक स्कूल सातारा येथे पीसीडीए (पेन्शन) अलाहाबाद यांचेमार्फत पेन्शन अदालत आयोजित केली आहे. निवृत्तीवेतनासंबंधी समस्या असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जळगाव येथे सादर करावे, आदिवासी उमेदवारांकरिता रावेर येथे प्रशिक्षण सत्र जळगाव - आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर येथे १ एप्रिल पासून प्रशिक्षण सत्र सुरू होत आहे. या प्रशिक्षणात आदिवासी उमेदवारांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांची (इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बौधिक चाचणी) तयारी करून घेतली जाते. इच्छुक उमेदवारांनी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २ शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.