ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - अमेरिकेच्या एका दापंत्याने आपल्या मुलीचे नाव "केरळ" असं ठेवलं आहे. केरळच्या सौंदर्य आणि संस्कृतीने हे दोघेही भारावून गेले. काही वर्षांपूर्वी पर्यटनासाठी येथे आलेल्या लॉस एन्जलिसच्या एका जोडप्याला केरळची भुरळ पडली. परदेशी पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांना येथील सौंदर्य आणि संस्कृतीची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. केरळच्या सौंदर्याची तर गोष्टच वेगळी आहे. देवाची भूमी म्हणून हे राज्य ओळखलं जातं. समुद्र, नद्या, माडाची झाडं सारंच काही बघणा-याला मोहून टाकतं. चार्ल्स क्रॅमर आणि त्यांची पत्नी ब्रीना 2004 मध्ये केरळमध्ये पर्यटनासाठी आले होते. केरळच्या सौंद्यर्याने हे दोघेही भारावून गेले. 2009 मध्ये जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी तिचे नाव "केरळ" असे ठेवले. सध्या क्रॅमर कुंटुंब ‘Worldschool101’ या प्रोजक्टसाठी भारतात आले आहेत. या प्रोजेक्ट अंतर्गत ते प्रत्येक देशातील गावांत चार आठवडे राहणार आहेत आणि तिथल्याच शाळांत आपल्या मुलांना शिकवणार आहे.त्यांच्या मुलीला आपलं नाव केरळ असं जगावेगळ का ठेवलं असा प्रश्न अनेक वेळा पडला होता. असं केरळच्या वडिलांनी सांगितले. ते म्हणाले यापूर्वी छोट्या केरळला आपलं नाव असं जगावेगळं का ठेवलं असा प्रश्न नेहमीच पडायचा पण केरळ पाहून बालमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सने भारतावरील प्रेमापोटी आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवलं आहे.