शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

अरे व्वा ! आता 'वेब व्हॉट्स अॅप'वरुनही करा फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड

By admin | Published: October 18, 2016 2:39 PM

व्हॉट्सअॅपवर आलेला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ फाईल मोबाईलवरुन फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. मात्र आता हीच सुविधा व्हॉट्सअॅप वेब वापरतानाही मिळणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - व्हॉट्स अॅपवर आलेला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ फाईल मोबाईलवरुन फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. मात्र आता हीच सुविधा 'वेब व्हॉट्स अॅप' वापरतानाही उपलब्ध झाली आहे. याधी 'वेब व्हॉट्स अॅप' वापरताना एखादा फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करायचा असेल तर ती फाईल डाऊनलोड करावी लागत असे, त्यानंतर ती सेव्ह झाली असेल तिथून शोधा आणि मग अटॅच करुन फॉरवर्ड करता येऊ शकत होतं. मात्र आता फाईल डाऊनलोड न करता तशीच फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 
 
मेसेज किंवा एखादी फाईल फॉरवर्ड करायची असेल तर त्या फाईलच्या डाव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार मेसेज, डिलीट हे ऑप्शन येतील. त्यामधील फॉरवर्ड ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही हव्या त्या व्यक्तीला तो मेसेज किंवा फाईल पाठवू शकता. ही सुविधा सध्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.
 
तुम्ही जर ग्रुपमध्ये चॅट करत असाल तर एखाद्या ठराविक व्यक्तीच्या मेसेजलाही रिप्लाय करु शकता. मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे एखादा मेसेज सिलेक्ट करुन रिप्लाय करता येते तिच सुविधा वेब व्हॉट्स अॅप वरही आहे. 
लवकरच व्हॉट्सअॅप आता व्हिडीओ कॉल सुरू करण्याचा विचार करत आहे. फेसबूक मेसेंजरप्रमाणे व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा सुरू करण्याचा विचार व्हाट्सअॅप करत आहे. मात्र ही सुविधा कधीपर्यत सुरू होईल हे अद्याप नक्की झालेले नाही. पुढील दोन ते तीन महिन्यात व्हिडीओ कॉलिंग सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबतच फोटोमध्ये ड्रॉईंग टूल्स आणि ब्लर करण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.