नवी दिल्ली : खराब झालेले धान्य, सडलेले बटाटे, मका आणि बिट यासारख्या कच्च्या मालापासून उत्पादित केलेले इथेनॉलही पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरण्याची मुभा देणाऱ्या नव्या राष्ट्रीय जैवइंधन धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.आत्तापर्यंत फक्त ऊसाच्या मळीपासून बनविलेले इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळता येत होते. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी एक कोटी लिटर जैव-इथेनॉल वापरले तर वर्षाला तेल आयातीच्या खर्चात २८ कोटी रुपयांची बचत होऊ शकते. सन २०१७-१८ मध्ये १५० कोटी लिटर जैव-इथेनॉल यासाठी वापरले जाईल व तेल आयाताचे सुमारे चार हजार कोटी रुपये वाचू शकतील, अशी अपेक्षा आहे.
नव्या जैवइंधन धोरणामुळे तेल आयातीत मोठी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 5:13 AM