बडोदाः गुजरातमधल्या माहिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर साप पाहिल्यावरच चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडते. पण एका गावातील शेतात काम करणाऱ्या 70 वर्षीय व्यक्ती जेव्हा त्या सापानं दंश केला, तेव्हा त्याला घाबरण्याऐवजी त्यानं सापावरच हल्ला चढवला आणि त्याचा चावा घेतला. त्यानंतर त्यांना अनेक रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा जीव काही बचावला नाही. पीडित व्यक्तीचं नाव जी. बैरिया आहे. त्यांचं वय 70 वर्षांच्या जवळपास आहे.शनिवारी ते शेतात काम करत होते. त्याच वेळी सापानं त्यांना दंश केलं. त्यानंतर घाबरण्याऐवजी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी सापाला पकडून त्याचा चावा घेतला. त्यांच्या सुनेनं या घटनेचा वृत्तांत गावकऱ्यांना सांगितला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सापानं दंश केल्यानं त्या व्यक्तीच्या शरीरात विष भिनलं. त्यांना उपचारासाठी लुनावाडातल्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चार तासांनी त्यांचा जीव गेला. त्या घटनेनं सापाचाही जीव गेला. या प्रकारानंतर अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
गुजरातमधील 'तो' वृद्ध सापाला चावला, कारण साप त्याला चावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 17:42 IST