Old Pension News : गेल्या काही काळापासून चर्चेत आलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत (Old Pension Yojana) केंद्र सरकारकडून एक मोठे अपडेट जारी करण्यात आले आहे. तुम्हालाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. होय, आता तुम्ही जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय निवडू शकता. OPS आणि NPS बाबत अनेक दिवसांपासून देशभरात वाद सुरू होता. त्यावर अखेर मोदी सरकारने तोडगा काढला आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना OPS चा लाभ मिळेल?जुन्या पेन्शन योजनेच्या अपडेटनुसार, 22 डिसेंबर 2003 पूर्वी नोकरीत भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर 22 डिसेंबर 2003 नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा लोकांना नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट केले जाईल.
ऑगस्टपर्यंत जुनी पेन्शन योजना निवडासरकारी कर्मचारी आपल्या इच्छेनुसार जुनी पेन्शन योजना निवडू शकतो. त्याला 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ही पेन्शन निवडण्याचा पर्याय आहे. यासोबतच सरकारने सांगितले की, जे पात्र कर्मचारी 31 ऑगस्टपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) पर्याय निवडणार नाहीत, त्यांना नवीन पेन्शन योजनेत टाकले जाईल. एकदा घेतलेला निर्णय बदलता येणार नाही, त्याला त्याच पेंशन योजनेत राहावे लागेल.