शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS कोचिंग सेंटरवर कारवाई; बेसमेंटमध्ये सुरू वर्ग सील...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 8:59 PM

दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

Old Rajendra Nagar Accident :दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर एमसीडी(दिल्ली महानगरपालिका) ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या दुर्घटनेनंतर एमसीडी कमिशनरने स्पष्टपणे सांगितले होते की, जिथे जिथे बेकायदा बेसमेंट आहेत, तिथे कारवाई केली जाईल. त्यांच्या आदेशानुसार, अनेक कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली असून, यात विकास दिव्यकीर्ती यांचे प्रसिद्ध दृष्टी IAS (व्हिजन) कोचिंग सेंटरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू विहारच्या वर्धमान मॉलच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेले दृष्टी (व्हिजन) कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, या बेसमेंटमध्ये पाच वेगवेगळे वर्ग सुरू होते आणि एका बॅचमध्ये 600-700 विद्यार्थी शिकतात. आता प्रशासनाने हे बेसमेंट सील केले आहे. दृष्टीसोबतच, आयएएस गुरुकुल, चहल अकादमी, प्लूटस अकादमी साई ट्रेडिंग, आयएएस सेतू, टॉपर्स अकादमी, दैनिक संवाद, सिव्हिल्सडेली आयएएस, करिअर पॉवर, 99 नोट्स, विद्या गुरू, गायडेन्स आयएएस, आयएएस के लिए आसान आणि एसे फॉर आयएएस या कोचिंग सेंटरवरदेखील कारवाई केली आहे.

आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीओल्ड राजेंद्र नगरमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली न्यायालयाने सोमवारी (29 जुलै) पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या पाच आरोपींमध्ये चार कोचिंगचे सहमालक आणि एका चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली. यावेळी पोलिस आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा संसदेतही मांडण्यात आला. लोकसभेत विविध पक्षांच्या सदस्यांनी चौकशीची मागणी केली. राज्यसभेतही खासदारांनी या विषयावर आपली मते मांडली.

नेमकी घटना काय ?राजेंद्र नगर परिसरात 'राव IAS' नावाने कोचिंग सेंटर चालवले जाते. या कोचिंग सेंटरने बेकायदेशीररित्या इमारतीच्या तळघरात लायब्ररीची सुविधा केली होती. शनिवारी रात्री दिल्लीमध्ये जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे या लायब्ररीत अचानक पाण्याचा लोंढा आला. या पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाdelhiदिल्ली