Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 03:33 PM2021-02-05T15:33:38+5:302021-02-05T15:36:07+5:30

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत.

older farmer came in Farmer Protest at Gazipur from village, Rakesh Tikait took him on shoulder | Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

googlenewsNext

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत. (Farmer Protest continue for 70 days, on Saterday farmers called chakka jam in country.)


या पार्श्वभूमीवर आज आंदोलनस्थळी एक वेगळेच दृष्य दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला राकेश टिकैत यांनी त्यांच्या खांद्यावर मारले होते. टिकैत यांनी सांगितले की, वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. उद्याचा चक्का जाम हा केवळ गावांमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये य़ाचा काहीच फरक दिसणार नाही. 
आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुर आहे. याद्वारे पुढे सरकारशी चर्चा केली जाईल. इथे गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलक बसले आहेत. चर्चा देखील झडत आहेत. इथे बसणारे सर्वच चुकीचे आहेत का, असा सवालही टिकैत यांनी विचारला आहे. 


केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या आरोपांवर टिकैत यांनी समाचार घेतला. सरकारकडून कोणत्या नेत्यावर लावलेल्या आरोपांवर कमतरता राहिलीय का? आज शेतकरी निम्म्या किंमतीत त्यांचे उत्पादन विकतात, हेच चुकीचे आहे का, असे ते म्हणाले. 


शुक्रवारी राज्यसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेस रक्ताची शेती करत असल्याचा आरोप केला होता. यावर टिकैत यांनी विरोधकांचे तर तेच सांगू शकतात, मी राज्यसभेतील चर्चा पाहिली नाही. शेतकरी शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्लीसोडून देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Web Title: older farmer came in Farmer Protest at Gazipur from village, Rakesh Tikait took him on shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.