लखनऊ : भाजपा 325 आमदारांच्या धुंदीत फिरतोय असा हल्लाबोल उत्तरप्रदेशमधील योगी सरकारवरच्या मित्रपक्षाने केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभरने हे मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी उत्तरप्रदेशमधील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी यावर खूपवेळा चिंता व्यक्त केली, कारण 325 आमदारांच्या धुंदीत भाजपा हे फिरत आहेत. राज्यभर ते आम्ही एनडीएमध्ये सामिल आहोत असं सांगतात पण ते त्याचं पालन करत नाही. त्यांचे सर्व लक्ष उत्तरप्रदेशमधील मदिंर बांधण्यावर आहे, निवडणूकीत मत देण्याऱ्या जनतेकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लश केलं आहे. असा टोला यावेळी त्यांनी मारला.
गेल्या 24 तासांमधील ओमप्रकाश यांचा योगी सरकारवर दुसरा हल्ला आहे. यापूर्वी आगामी राज्यसभा निवडणुकीत सुहेलदेव भारतीय समाज पार्टी भाजपाच्या विरोधात मदतान करण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळं भाजपा सुहेलदेव भारतीय समाज पार्टीची समजूत काढणार का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
भाजपाचे मित्रपक्ष आपली नाराजी व्यक्त करत आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडणार आहेत. वायएसआर काँग्रेसनंही रणशिंग फुंकल्यानं आणि विरोधक एकवटल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढलीय.