ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - दिग्गज अभिनेता ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कायदेशीररित्या विवाहबंधनात असूनही वेगळे राहू शकतात. मात्र त्रयस्थाच्या उपस्थितीतच दोघे एकमेकांची भेट घेऊ शकतात. कोर्टाने १८ वर्षीय मुलगा इशानला भेटण्याची परवानगी ओम पुरींना देण्यात आली आहे.
बॉलिवूडमध्ये रणवीर शौरी-कोंकणा, फरहान-अधुना यांच्या घटस्फोटांची उदाहरणं ताजी असतानाच आणखी एका जोडप्याच्या डिव्होर्समुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
नंदिता यांनी ओम पुरींवरील चरित्रात्मक पुस्तक ‘अनलाईकली हिरो : स्टोरी ऑफ ओम पुरी’ मध्ये अनेक गौप्यस्फोट केले होते. यानंतर त्यांच्यातील धुसफुस चव्हाट्यावर आली.
पुस्तकातील गौप्यस्फोट :
वयाच्या १४ व्या वर्षी ओम पुरी यांचे घरातील कामवाल्या महिलेसोबत शारीरिक संबंध होते, त्याचप्रमाणे वृद्ध पित्याची काळजी घेणाऱ्या केअरटेकर महिलेशीही त्यांचे संबंध असल्याचा गौप्यस्फोट नंदिता यांनी चरित्रात केला आहे.