शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात; शपथविधी ५ डिसेंबरलाच, भाजपचा नेता ३ ला निवडणार
2
LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला
3
माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा
4
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला
5
हिंदुंवरील अत्याचार त्वरित थांबवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांगलादेशातील सरकारला आवाहन
6
Today Daily Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य
7
छोटे पक्ष, अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार; मुंबईत मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध
8
‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर
9
चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू
10
दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा; पुडुचेरीनजीक ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस; रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत
11
निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले समोरासमोर चर्चेचे निमंत्रण; महाराष्ट्रातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली
12
आम्लेट पाव विकणाऱ्याचा मुलगा बनला जज; बापलेकावर शुभेच्छांचा वर्षाव
13
कोर्टाचे दोन तास वाया घालविणे पडले 5 लाखांना; याचिकादाराला ठोठावला दंड
14
लालपरीचा प्रवास महाग? १४% भाडेवाढीचा प्रस्ताव; शंभर रुपयांमागे होऊ शकते १५ रुपये वाढ
15
६०० कोटींचा घोटाळा; अंबर दलाल अटकेत; १३०० सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक
16
मुंबईत आजपासून पाच दिवस पाणीकपात; मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिकांना तांत्रिक बिघाडाचा फटका
17
जीवनशैली बदला, वंध्यत्व टाळा ! वे‌ळोवे‌‌ळी रक्ततपासणी, सोनोग्राफी करण्याची गरज
18
शरद कपूरवर लैंगिक छळाचा गुन्हा; रीलस्टार तरुणीची तक्रार, घरी बोलावले आणि आक्षेपार्ह वर्तन केले
19
अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी
20
सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक

आम्लेट पाव विकणाऱ्याचा मुलगा बनला जज; बापलेकावर शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 8:03 AM

वडील एका ठेल्यावर आम्लेट पाव विकायचे. त्यांचा मुलगा आता न्यायमूर्ती बनला आहे. या बापलेकाच्या यशामुळे सारे भारावले आहेत.

औरंगाबाद (बिहार) : आईवडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करतात. एवढे कठाेर परिश्रम घेतल्यानंतर मुलगा शिकून माेठा झालेला पाहताच, त्या कष्टाचे त्यांना समाधान मिळते. बिहारच्या औरंगाबादमध्ये एका मुलाने आईवडिलांच्या कष्टाचे चीज करू दाखविले आहे. वडील एका ठेल्यावर आम्लेट पाव विकायचे. त्यांचा मुलगा आता न्यायमूर्ती बनला आहे. या बापलेकाच्या यशामुळे सारे भारावले आहेत.

आदर्श कुमार असे या मुलाचे नाव आहे. ताे बिहार लाेकसेवा आयाेगाच्या अति मागासवर्गीय श्रेणीत न्यायिक सेवा परीक्षेत १२०व्या स्थानी आला आहे. (वृत्तसंस्था)

शिक्षणासाठी आईने गुपचूप घेतले कर्ज

आदर्श कुमार यांच्या कुटुंबात ७ जण आहे. वडिलांचे उत्पन्न जेमतेम असते. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले.

पैसे अपुरे पडू नयेत, यासाठी त्याची आई सुनैना यांनी स्वयंसहायता गटाकडून कर्जही घेतले. मात्र, हे त्यांनी आतापर्यंत लपवून ठेवले हाेते.

स्थिती हलाखीची

या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. आदर्श कुमार याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडील विजय साव हे ठेला चालवायचे. दुसरीकडे आईनेही तेवढेच परिश्रम घेतले आहेत.

आईवडिलांकडून मिळाली प्रेरणा

मुलाने आईवडिलांच्या कष्टाचा मान राखत कठाेर परिश्रम घेतले. त्यांची मेहनत पाहून मला प्रेरणा मिळाली आणि मन लावून अभ्यास केला. म्हणूनच हे यश मिळाले, असे आदर्श कुमार याने सांगितले.