देशावर कोरोनासोबतच एका महाचक्रीवादळाचे संकट घोंगावत असताना बेंगळुरूमध्ये रहस्यमयी आवाजाने थरकाप उडविला आहे. बुधवारी दुपारी बेंगळुरुमध्ये एक रहस्यमयी आवाज ऐकायला आल्याने चर्चांना उत आला आहे. तर अधिकारीही भयभीत झाले असून थेट हवाई दलालाच सावध करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी बेंगळुरुच्या लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला. हा असा आवाज होता, की भूकंप आला असेल किवा मोठा झटका बसला असेल. हा आवाज जवळपास ५ सेकंद घुमत होता. कर्नाटक सरकारच्या आपत्ती निवारण केंद्राकडून सांगण्यात आले की, हा कोणत्याही प्रकारचा भूकंप नव्हता. तसेच जमीनीमध्येही कोणत्याही प्रकारची कंपने झाली नाहीत. मात्र, जो आवाज होता तो वेगळाच होता.
बेंगळुरुच्या व्हाईटफिल्ड भागात या आवाजाची तिव्रता अधिक होती. यामुळे तेथील अधिकारी कमालीचे सतर्क झाले आहेत. तसेच हवाईदल आणि एचएएलशीही संपर्क साधण्यात आला आहे. आता त्यांच्या उत्तराची वाट पाहिली जात आहे.
बेंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी सांगितले की, साधारण तासाभरापूर्वी हा आवाज आला होता. मात्र, कोणालाही काही थांगपत्ता लागलेला नाही. तसेच कुठेही अद्याप नुकसान झाल्याचे किंवाम मदतीची मागणी केल्याचे समजलेले नाही. हा आवाज जवळपास २१ किमीपर्यंत ऐकायला गेला.
यावरून नेटकऱ्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या होत्या.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हाय रे दैवा! फोन अॅपलचा पण डिस्प्ले सॅमसंगचा; Iphone 12 वर काय ही वेळ आली
चीनची १९४९ पासून जखम भळभळती; नौदलाचा अजस्त्र विकास केवळ तैवानमुळेच
निलेश राणेंवर तृतीयपंथी भडकले; 'हिजडा' शब्दावरून दिला इशारा
टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार
कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा