शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Surya Grahan 2019 : अरे बापरे!  एवढी आहे ग्रहण पाहताना नरेंद्र मोदींनी घातलेल्या गॉगलची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 5:59 PM

Surya Grahan 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्रहण पाहतानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पण पंतप्रधानांच्या या फोटोंपेक्षा त्यांनी घातलेल्या गॉगलचीच चर्चा अधिक झाली

नवी दिल्ली - आज झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्सुकता दाखवली. सकाळी ग्रहणाला सुरुवात झाल्यावर पंतप्रधान मोदींनी विशिष्ट उपकरणांद्वारे ग्रहण पाहिले. पंतप्रधानांचे ग्रहण पाहतानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या या फोटोंपेक्षा त्यांनी घातलेल्या गॉगलचीच चर्चा अधिक झाली. काही नेटकऱ्यांनी तर मोदींच्या या गॉगलचा ब्रँड आणि त्याची किंमतही शोधून काढली आहे. ग्रहण पाहताना मोदींनी घातलेला गॉगल हा मायबॅड आयवेअर या जर्मन कंपनीचा असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. या गॉगलची किंमत ही हजारो डॉलरच्या घरात असते. मोदींचा गॉललही अशाच महागड्या गॉगलपैकी असून,  दि डिप्लोमॅट वर या प्रकारामधील हा गॉगल सुमारे दोन हजार 159 डॉलर किमतीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय चलनामध्ये विचार करावयाचा झाल्यास या गॉगलची किंमत दीड लाख ते एक लाख  65 हजारांपर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या निवस्थानामधून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांना थेट सूर्यग्रहण पाहता आले नसल्याचे खुद्द नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. दरम्यान,  शास्त्रज्ञांसोबत सूर्यग्रहण पाहत असल्याचे फोटो मोदींनी  ट्विटरवर शेअर केले होते. नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर एका नेटकऱ्याने रिट्विट करत तुमचा फोटो सोशल मीडियावर मीम्समध्ये वापरला जात असल्याचे सांगितले. मग नरेंद्र मोदी यांनी देखील तुमचे आभार असल्याचे सांगत आनंद घ्या असं मिश्कील उत्तर दिलं.चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणNarendra Modiनरेंद्र मोदीsurya grahanसूर्यग्रहण