नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) प्रकरणे मंगळवारी 200 वर पोहोचली आहेत. आतापर्यंत देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. तसेच, या राज्यांमध्ये ओमायक्रॉनपासून जवळपास 77 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची 54-54 प्रकरणे आहेत, तर तेलंगणामध्ये 20, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18 , केरळमध्ये 15 आणि गुजरातमध्ये 14 ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली आहेत.
भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत असली, तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणे आहे की, सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नाही. आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा हे देशात समोर येत असलेल्या मृत्यू आणि कोरोना प्रकरणांवर म्हणाले, ओमायक्रॉन रुग्णांची वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, आधीच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे प्रकरणे वाढत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंट विदेशी प्रवाशांद्वारे पसरू शकतो. अशा परिस्थितीत सरकारकडून विमानतळ आणि प्रवेश मार्गांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, डॉ. समीरन पांडा यांचे असे म्हणणे आहे की, रविवारी दिल्लीतील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण लसीकरण देखील संसर्गाविरूद्ध प्रभावी सिद्ध होत नाही. आता राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. ओमायक्रॉनची प्रकरणे वाढू शकतात, त्यामुळे हे गरजेचे नाही की गंभीर संसर्गाचा ताण येईल. ओमायक्रॉनच्या 100 गंभीर प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे प्रवासाशी संबंधित आहेत.
दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसची 5,326 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, जी 581 दिवसांतील संसर्गाची सर्वात कमी संख्या आहे आणि यासह संसर्गाच्या एकूण प्रकरणांची संख्या 3,47,52,164 वर पोहोचली आहे. तसेच, रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 79,097 वर आली आहे, जी 574 दिवसांतील सर्वात कमी आहे.