नवी दिल्ली – ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता लसीवर लेसेंटचा हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीपासून मिळणारी सुरक्षा दोन्ही डोसनंतर ३ महिन्यांनी कमी होतेय. भारतात बहुतांश लोकांनी एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड लस घेतली आहे. त्यामुळे लेसेंटचा हा रिपोर्ट भारतीयांसाठी चिंता वाढवणारा आहे.
संशोधकांनी ब्राझील आणि स्कॉटलँडच्या डेटाचं विश्लेषण केले. एस्ट्राजेनेका कोविशील्ड लस घेणाऱ्यांना गंभीर आजारापासून संरक्षित राहण्यासाठी बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे. ही स्टडी एस्ट्राजेनेका लस घेतलेल्या स्कॉटलंडमधील २० लाख लोकं आणि ब्राझीलमधील ४.२ कोटी लोकांवर आधारित केली आहे. स्कॉटलंडमध्ये लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांच्या तुलनेत डोस घेतल्यानंतरच्या ५ महिन्यांनंतर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं मृत्यूच्या संख्येत ५ पटीने वाढ झाली आहे. लसीचा प्रभाव जवळपास ३ महिन्यांनी संपुष्टात येत असल्याचं दिसून येते. दुसरा डोस घेतल्यानंतर ३ महिन्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल आणि मृत्यूचा धोका वाढतो.
स्कॉटलंड आणि ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या सुरक्षा तुलनेत रुग्णालयात दाखल आणि मृत्यूचा धोका ३ पटीने वाढतो. ब्राझीलमध्येही अशीच आकडेवारी पाहायला मिळते. ब्रिटनच्या एडिनबर्ग यूनवर्सिटीचे प्रोफेसर अजीज शेख म्हणाले की, कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीची आवश्यकता आहे. परंतु त्याचा प्रभाव कमी होणे चिंतेचा विषय आहे. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीचा प्रभाव कधीपासून कमी होतो हे शोधून बूस्टर डोसची रणनीती आखायला हवी जेणेकरुन अधिक सुरक्षा देता येईल. लसीचा प्रभाव कमी होण्याचा परिणाम नव्या व्हेरिएंटच्या संक्रमणामुळे दिसून येत आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, या आकडेवारीबाबत समजून घ्यायला हवं. कारण लस न घेतलेल्यांची तुलना लसीकरण झालेल्या लोकांशी करणं कठीण आहे. विशेष म्हणजे बहुतांश वयस्क व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झाले आहे. ग्लासगो महाविद्यालयाचे प्रोफेसर श्रीनिवास कातिकिरेड्डी म्हणाले की, स्कॉटलंड आणि ब्राझील येथील डेटा पाहिला तर कोविड १९ सुरक्षेत ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीचा प्रभाव कमी दिसून येतो. आमचं काम बूस्टर डोसचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आहे. भलेही तुम्ही ओक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.