नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. त्यातच ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं अथवा विनालक्षण असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्यातुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी घातक असला तरी तो सर्वात जास्त वेगाने संक्रमण पसरवत आहे.
त्यात केंद्र सरकारने खबरदारी म्हणून नवीन नियमावली जारी केली आहे. यात विना लक्षणं अथवा सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच १४ दिवसांऐवजी ७ दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या नियमावलीत ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी ९४ टक्क्यांवरुन ९३ टक्के केली आहे. नियमावलीनुसार, क्वारइंटाईनच्या दिवसाची सुरुवात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या दिवसापासून मानली जाईल. क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये सलग ३ दिवस ताप आढळला नाही तर त्याला ८ व्या दिवशी कोरोना निगेटिव्ह मानलं जाईल. त्यानंतर कोरोना चाचणी करणंही गरजेचे नाही.
अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत हा तिसरा देश आहे ज्याठिकाणी क्वारंटाईनचे दिवस कमी करण्यात आले आहेत. देशात सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. एका अंदाजानुसार, त्यातील ६० टक्के रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत. ओमायक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं नाहीत. परंतु डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तो ३० पट वेगाने पसरत असल्याने काळजी घेणं गरजेचे आहे.
एसिम्प्टोमेटिक रुग्ण कोणाला गणलं जाईल?
एसिम्प्टोमेटिक रुग्ण म्हणून त्यांना गणलं जाईल ज्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे परंतु त्यांच्यात कुठलीही लक्षणं आढळली नाहीत. तसेच खोलीत ऑक्सिजन सॅच्युरेशन ९३ टक्क्यांहून अधिक हवं. त्याआधी ते ९४ टक्क्यांपेक्षा जास्त हवं होतं.
सौम्य लक्षणं असणारे रुग्ण कोणते?
सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना ज्यांना विना ताप श्वास घेण्यासही काही अडचण नाही. त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९३ टक्क्याहून अधिक हवं.
कसे रुग्ण होम आयसोलेटेड होणार?
डॉक्टरांच्या परवानगीने एसिम्पटोमेटिक अथवा सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाईन केले जाईल.
ज्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांच्या घरी रुग्णासोबत त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबाचीही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था आहे.
रुग्णाच्या देखभालीसाठी एक व्यक्ती २४ तास राहायला हवा. देखभाल करणारा आणि डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात राहतील जोवर रुग्णाचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात येत नाही.
कंट्रोल रुमचा नंबर कुटुंबाकडे असेल आणि वेळोवेळी ते क्वारंटाईन रुग्णांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देतील.
वृद्धांना देखील घरी विलिगीकरणात ठेवता येऊ शकते?
वृद्ध संक्रमित आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना डॉक्टरांच्या परवानगीनंतरच होम आयसोलेशन केले जाईल.
एचआयव्ही किंवा कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन केले जात नाही, परंतु डॉक्टरांनी उपचारानंतर होम आयसोलेशनची परवानगी दिल्यास ते क्वारंटाईन होऊ शकतात.
घरी क्वारंटाईन झालेल्या रुग्णांना काय करावे आणि करू नये?
घरातील क्वारंटाईन रुग्णाला कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहावे लागेल. विशेषत: वृद्ध आणि बीपी, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांपासून अंतर ठेवावे लागेल.
आरोग्य विभागाने रुग्णासाठी ज्या खोलीची निवड केली आहे, त्याच खोलीत रुग्णाला क्वारंटाईन राहावं लागणार आहे. खोल्या वारंवार बदलू नका.
क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांची खोली उघडी आणि हवेशीर असावी जेणेकरून ताजी हवा आत आणि बाहेर जाऊ शकेल. रुग्णाने त्यांच्या खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
विलिगीकरण झालेल्या रुग्णाला खोलीच्या आतही ट्रिपल लेयर मास्क वापरावा लागेल. जर मास्क ८ तासांनंतर ओला किंवा गलिच्छ झाला तर तो बदलला पाहिजे.
रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्ण दोघांनीही N-95 मास्क वापरावा.
मास्क टाकून देण्यापूर्वी, त्याचे तुकडे करा आणि कागदाच्या पिशवीत किमान ७२ तास ठेवा. त्यानंतर मास्क फेकून द्या.
रुग्णाने विश्रांती घ्यावी आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.
सावधगिरी बाळगा आणि आपले हात वारंवार धुवा. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर किमान ४० सेकंद वापरा.
रुग्णाला दिलेली भांडी किंवा इतर वस्तू कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत शेअर करु नये.
दारे, स्विच बोर्ड, मास्क आणि हातमोजे यांसारख्या उपयुक्त वस्तू देखभाल करणारी व्यक्ती किंवा रुग्णाने स्वच्छ ठेवाव्यात.
रुग्णाने त्याची नाडी आणि ऑक्सिजनची पातळी तपासत राहावी.
बाधित व्यक्ती दररोज त्याच्या शरीराचे तापमान तपासेल आणि त्याची तब्येत बिघडली तर ही बाब ताबडतोब डॉक्टर आणि नियंत्रण कक्षाला कळवावी लागेल.
रुग्णावर घरी कसे उपचार केले जातील?
क्वारंटाईन दरम्यान रुग्ण थेट डॉक्टरांच्या संपर्कात असेल आणि त्याची तब्येत बिघडल्यास त्वरित तक्रार करेल.
जर रुग्णाला आधीच कोणताही आजार असेल तर तो डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे घेऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्ण गुळण्या करू शकतात आणि दिवसातून तीनदा स्टीम देखील घेऊ शकतात.
रुग्णाने सोशल मीडियावर चुकीची माहिती देणे टाळावे.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध, रक्त तपासणी आणि सीटी स्कॅन यासारख्या गोष्टी स्वतः करू नका.
क्वारंटाईनच्या काळात डॉक्टरांना भेटणे कधी आवश्यक आहे?
जर तीन दिवसांहून अधिक १०० अंशांपेक्षा जास्त ताप राहिल्यास.
श्वास घेण्यास त्रास होईल
रुग्णाची ऑक्सिजन सॅच्युरेशन एका तासात किमान तीन वेळा ९३% पेक्षा कमी आली असेल
रुग्णाने एका मिनिटात २४ पेक्षा जास्त वेळा श्वास घेतला पाहिजे.
छातीत सतत वेदना किंवा दाब जाणवणे.
खूप थकवा आणि स्नायू दुखत होते.
होम आयसोलेशन कधी संपेल?
आयसोलेशनमध्ये ३ दिवस सतत ताप न आल्यास ७ दिवसात रुग्णाला कोरोना निगेटिव्ह समजले जाईल.
अशा प्रकारे लक्षणे नसलेल्या रुग्णांना ७ दिवसांत होम आयसोलेशनमधून डिस्चार्ज देण्यात येत आहे.
७दिवसांनंतर, होम आयसोलेटेड रुग्णाला कोणत्याही प्रकारची चाचणी करावी लागणार नाही.