नवी दिल्ली : देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. या विषाणूचे एकाच दिवसात इतक्या प्रमाणात नवे रुग्ण सापडण्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडली आहे.
ओमायक्रॉनच्या बाधितांची एकूण संख्या ५७८ वर पोहोचली असून, त्यातील १५१ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली. या विषाणूचा १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रसार झाला आहे.
उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत ०.२२ टक्के आहे. मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. कोरोनाचा दररोजचा व दर आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे ०.८७ व ०.६३ टक्के तर मृत्यूदर १.३८ टक्के आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असून, त्यापाठोपाठ केरळ, गुजरात, राजस्थान, तेलंगणा यांचा क्रमांक लागतो.
- गेल्या चोवीस तासांत ६,५३१ नवे रुग्ण, ३१५ जणांचा मृत्यू- ३,४७,९३,३३३ एकूण कोरोना रुग्ण
- ३,४२,३७,४९५ जण बरे झाले
- ७५,८४१ उपचार घेणाऱ्यांची संख्या
- ४,७९,९९७ जणांचा कोरोनामुळे आजवर मृत्यू झाला आहे.
- गेल्या ६० दिवसांत दररोज नव्या रुग्णांची संख्या १५ हजारांपेक्षा कमी आहे.