शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Omicron : ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत... ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी मोदी सरकारची काय आहे तयारी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:56 PM

Omicron variant : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे.

नवी दिल्ली :  भारतातील 13 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात 161 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 54 प्रकरणे आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, कोरोनाच्या येणाऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते म्हणाले, देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका दिवसात 2.5 कोटी लसीचे डोस देऊन इतिहास रचला आहे. ऑक्सिजनचा बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. याशिवाय, विविध राज्यांमध्ये 48 हजार व्हेंटिलेटर बसवण्यात आले आहेत, असे मनसुख मांडविया म्हणाले.  

कोरोना महामारीवर मात करण्याच्या तयारीसाठी राज्यांना विशेष पॅकेज परवानगी दिली आणि ते राज्यांना दिले जात आहे, असे मनसुख मांडविया म्हणाले. याचबरोबर,पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 88 टक्के लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे. तर  58 टक्के वयस्कर लोकांना लसीचा दुसरा डोस देखील मिळाला आहे. देशातील बहुतांश लोकांना लसीचा डोस मिळाला आहे, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले.

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 161 प्रकरणेदेशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 161 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत, भारतातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. मात्र, भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही, ही दिलासादायक बाब आहे. सर्वांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर आतापर्यंत 42 रुग्ण बरे झाले आहेत.

कोणत्या राज्यात किती ओमायक्रॉनची  प्रकरणे?महाराष्ट्र - 54दिल्ली - 32तेलंगणा - 20राजस्थान - 17 गुजरात - 13 केरळ - 11कर्नाटक - 8उत्तर प्रदेश - 2 तामिळनाडू - 1 आंध्र - 1पश्चिम बंगाल - 1चंदीगड - 1

दिल्लीत प्रत्येक रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग होणारओमायक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे पाहता दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत प्रत्येक कोरोना रुग्णाच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. आतापर्यंत, केवळ परदेशातून किंवा जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात होते. यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे बुस्टर डोसला मान्यता देण्याची मागणी केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनRajya Sabhaराज्यसभा