शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : दिवसभरात ओमायक्रॉनचे 5 नवे रुग्ण, आतापर्यंत देशातील रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 21:14 IST

Omicron variant live updates: रविवारी महाराष्ट्रातील नागपुरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली : भारतातही कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron)या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे भारतातओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.  केरळमध्ये रविवारी ओमायक्रॉनचे एक प्रकरण समोर आले आहे. बाधित रुग्ण ब्रिटनमधून अबुधाबीमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासह, देशातील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 38 वर पोहोचली आहे. 

रविवारी महाराष्ट्रातील नागपुरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून दिल्लीमार्गे नागपुरात पोहोचली आहे. तसेच, आजच कर्नाटक, चंदीगड आणि आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. दरम्यान, केंद्र सरकार ओमॉयक्रॉनवर मात जाण्यासाठी खबरदारी घेत आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोना टेस्ट आणि लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे.

चंदीगडमध्ये संसर्ग झालेला 20 वर्षीय तरुण इटलीहून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. 22 डिसेंबर रोजी तो इटलीहून भारतात आला, तेव्हापासून तो होम क्वारंटाईनमध्ये होता, त्यानंतर 1 डिसेंबर रोजी पुन्हा तपासणी केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला, ज्यामध्ये त्याला ओमायक्रॉनच्या संसर्गाची पुष्टी झाली. तरुणामध्ये कोणत्याही व्हेरिएंटचे लक्षणे दिसून आली नाहीत आणि त्याने इटलीमध्ये फायझर लसीचा डोसही घेतला होता. 

दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, मात्र रविवारी पुन्हा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. दुसरीकडे, आंध्र प्रदेशमध्ये, ओमायक्रॉन संक्रमित व्यक्ती आयर्लंडहून परतली आहे. राज्यात हा पहिलाचा ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आहे. तर कर्नाटकात सापडलेला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. कर्नाटकात आतापर्यंत ओमायक्रॉनची तीन प्रकरणे नोंदवली आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता!कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे वृत्त प्रथम आढळल्यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशांवर प्रवास बंदी लादली आहे. याआधी जगाने कोरोना डेल्टा व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहिला आहे. याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का? किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा सुरु आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत