Omicron Variant India : गेल्या काही दिवसांमध्ये देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे काही रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतही आणि अन्य काही देशांमध्ये प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं योग्य त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. परंतु या विषाणूच्या नव्या व्हेरिअंटची आक्रमकता हाच त्याचा कमकुवतपणा असल्याचा दावा आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी केला आहे. "ज्या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होतो, तो घातक असू शकत नाही. वैज्ञानित तथ्यांची पडताळणी करून हे सांगितलं जात आहे. त्यामुळे या विषाणूच्या बदलत्या स्वरूपाला घाबरण्याचं कारण नाही. परंतु लोकांनी सतर्क राहत योग्य ती काळजी घेतली पाहिजे," अशी माहिती आयसीएमआरचे चीफ एपिडमोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा यांनी सांगितलं."ज्या स्वरूपांमध्ये अधिकाधिक प्रसार होण्याची क्षमता होती, त्यांचा लोकांवर परिणाण कमी झाला आहे, हे ओमायक्रॉन व्हेरिअंटपासून डेल्टा आणि अन्य व्हेरिअंटच्या आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार समोर आलं आहे," असं पांडा म्हणाले. अमर उजालानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "ज्या बदललेल्या स्वरूपांमध्ये लक्षणं हलकी असतात, त्यांच्या संसर्गाची क्षमता अधिक असते. त्यांचा अधिक परिणाम होत नाही. जो विषाणू अधिक घातक असतो आणि त्यामुळे संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होतो, परंतु अशा मृत व्यक्तीकडूनही संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा तितक्या तेजीनं होत नाही, जितका सुरूवातीच्या टप्प्यात ओमायक्रॉनच्या बाबतीत पहायाला मिळालाय," असंही त्यांनी स्पष्ट केलं.लसीकरण, मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाचीभारतात जितक्या प्रमाणात याचे रुग्ण दिसतील त्याचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचं पालन हा उपाय आहे. या व्हेरिअंटचा यापूर्वीच्या व्हेरिअंट इतक्याच वेगानं प्रसार होत आहे. यापूर्वीच्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी जे उपाय आणि पद्धतीचा अवलंब करण्यात आला तेच उपाय यावर लागू होतील. अशातच लोकांनी घाबरण्यापेक्षा महासाथीपासून बचाव करण्यासाठी असलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं.काय म्हणाल्या शोध लावणाऱ्या वैज्ञानिक?"या व्हेरिअंटचा प्रसाराचा वेग पूर्वीच्या व्हेरिअंटच्या तुलनेत अधिक आहे. परंतु हा व्हेरिअंट डेल्टा इतका घातक नाही. सुरुवातीलाच लक्षणं दिसल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची गरजही पडत नाही. परंतु याची लक्षणं डेल्टा व्हेरिअंटपेक्षा निराळी आहेत," असा दावा जगात सर्वप्रथम ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या साऊथ आफ्रिकन मेडिकल काउन्सिल असोसिएशनच्या चेअरपर्सन डॉ. एंजेलिक कोएट्जी यांनी केला.
७ लसींमुळे धोका नाहीकाही संशोधनांमध्ये कालांतरानं लस दिलेल्यांमध्येही कोविड संसर्गाविरोधात सुरक्षा कमी होत असल्याचे संकेत मिळाले होते. यामुळेच ज्यांना अधिक धोका आहे अशा व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात यावा असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं. परंतु तिसरा डोस घेतल्यानंतर त्यापासून किती सुरक्षा वाढेल याबाबत अधिक संशोधन झालेलं नाही. ऑक्सफर्ड, फायझर, नोवावॅक्स, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, वलनेवा आणि क्योरवॅक या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा समावेश असल्याचं लॅन्सेटमध्ये गुरूवारी छापण्यात आलेल्या संशोधनात सांगण्यात आलं आहे.