२३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:33 AM2024-08-20T05:33:12+5:302024-08-20T07:03:32+5:30
पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा करणार आहेत. रशिया व युक्रेन युक्रन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे व तिथे शांतता प्रस्थापित होण्याकरिता तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो, असे भारताकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील. तेथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर पंतप्रधान युद्धाबाबत चर्चा करतील. युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी राजनैतिक प्रयत्न व चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा, अशी भारताची भूमिका आहे.
युक्रेन व रशियाोबत भारताचे चांगले संबंध
युक्रेन व रशिया परस्परांविरोधात उभे ठाकले असले तरी या दोन देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत.युक्रेनच्या युद्धाबाबत भारताने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी याआधी पाश्चिमात्य राष्ट्रांनी केली होती.