Indian Navy Day 2023 : आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भारतीय नौदलाने आपल्या X हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे. बेधडक आवाजात आजच्या दिवसाची महती अमिताभ बच्चन मांडणार आहेत. दरवर्षी नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. परंतु यंदा सिंधुदुर्ग येथे हा नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा तारकर्ली समुद्रकिनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
४ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या शौर्याचे तसेच पराक्रमाचे स्मरण करून देणारा आहे. भारताच्या अनेक यशस्वी मोहिमा म्हणजेच कारगील बंदरावरील हल्ला, विशाखापट्टणम येथे केलेली कुच महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरणार्थ ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा करण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचून सागरी सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले. सागरी मार्गाने हल्ला कऱणाऱ्या शत्रुंचे हल्ले उधळवून लावले. महाराजांच्या या योगदानाबद्दल भारतीय आरमाराकडून आज त्यांना खास आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. भारताच्या विशाल आणि समृद्ध सागरी मोहिमेच्या वारसा या दिनानिमित्त जपला जाणार आहे.
येथे पाहा व्हिडीओ :