लॉटरीचे पैसे आले नाहीत, तो रिक्षावाला जिवाला वैतागला; घरासमोर मागणाऱ्यांच्या रांगाच रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:09 PM2022-09-26T22:09:10+5:302022-09-26T22:11:34+5:30
एकतर कर्ज काढणार होता. एवढे पैसे मिळणार आहेत, पण त्याचे टेन्शन काही कमी झाले नाही. कारण त्याला स्वस्थ जगू देतील, आनंद घेऊ देतील ते लोक कुठचे.
काही दिवसांपूर्वी केरळच्या रिक्षावाल्याला २५ कोटींची लॉटरी लागली होती. त्यातून ११ कोटी रुपये सरकारला करस्वरुपात देऊन उरलेली रक्कम त्याला मिळाली. ही काही थोडी थोडकी नाही, पण आता तो पुरता वैतागला आहे. एवढा की त्याला घरही बदलावे लागले आहे. काय झाले असे...
रिक्षा चालवून संसाराचा गाडा चालेना म्हणून तो देश सोडून परदेशात कुकची नोकरी पत्करणार होता. त्यासाठी त्याने बँकेतून साडे तीन लाखांचे कर्जही काढले होते. परंतू, कर्ज मंजूर व्हायला आणि ही लॉटरी लागायला एकच टाईम झाला. ओणम सणामध्ये ओणम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला होता. श्रीवराहमच्या अनुप याला ही लॉटरी लागली आहे. दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला.
एवढे पैसे मिळणार आहेत, पण त्याचे टेन्शन काही कमी झाले नाही. कारण त्याला स्वस्थ जगू देतील, आनंद घेऊ देतील ते लोक कुठचे. अनूपने नुकतीच एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. या व्हिडीओत त्याने लॉटरी जिंकल्याचे कळताच लोक दूर दूरवरून त्याच्या दारात येऊ लागले आहेत. या लोकांना पैसे मदत म्हणून हवे आहेत. यामुळे त्याला त्याचे घरही शिफ्ट करावे लागले आहे.
मी या लोकांना सांगून सांगून थकलो, की मला अजून बक्षिसाची रक्कमच मिळालेली नाहीय, तरी ते ऐकत नाहीएत. आता तर लोक पाठलागही करू लागले आहेत, असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. लॉटरीत एवढी मोठी रक्कम जिंकल्याचे जेव्हा मला कळले तेव्हा माझा आनंद सातव्या गगनावर मावत नव्हता. आता माझे शेजारीदेखील या लोकांना वैतागले आहेत. माझ्या घराभोवती आणि आजूबाजूच्या परिसरात हे लोक नेहमी घिरट्या घालत असतात, असे तो म्हणतो. आता वाटतंय की लॉटरीत पहिलं बक्षीस नको, दुसरे किंवा तिसरे मिळायला हवे होते, निदान शांततेत जगू तरी शकलो असतो, असे त्याला वाटू लागले आहे.
अनूपने १७ सप्टेंबरला हे तिकीट खरेदी केले होते. त्याला कर कापून १५ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत. ओणम बंपरची ६७ लाख तिकिटे छापण्यात आली. एका तिकिटाची किंमत 500 रुपये होती आणि जवळपास सर्व तिकिटे विकली गेली होती.