नवी दिल्लीः 17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.एनडीएला यंदा 306 जागा मिळण्याचा अंदाज TIMES NOW-VMR 2019 Exit Pollमधून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांना 104 जागा मिळण्याचा कयास बांधला जात आहे. तर एनडीएला 41.1 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यूपीएला 31.7 टक्के मतं मिळतील, तर इतरांना 27.2 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.
23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. निवडणूक प्रचारादरम्यान विविध संस्थांनी मतदारांमध्ये जात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष, उमेदवार यांचा विजय, पराभव याची गणिते मांडली जातात. सी-व्होटर, सीएसडीएस, नेल्सन, लोकनिती, चाणक्य यासारख्या संस्था ओपिनियन पोल घेत असतात. या संस्थांची आपली स्वत:ची टीम असते, जी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांची मते जाणून घेते.