जे मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना यश नक्कीच मिळतं. ज्योती रेड्डी हे त्याचंच एक प्रेरणादायी उदाहरण आहे. ज्य़ा आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात राहायच्या. ज्योती यांच्याकडे दोन वेळचं जेवायलाही पैसे नव्हते. ज्योती शेतमजूर म्हणून अवघ्या 5 रुपयांत काम करायच्या. मात्र आज ज्योती कोट्यवधींची मालकीण आहे. ज्योती रेड्डी या सॉफ्टवेअर सोल्युशन्स इंक. या अमेरिकेतील मोठ्या कंपनीच्या सीईओ आहेत.
ज्योती रेड्डी यांचा जन्म वारंगल जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात 1970 मध्ये झाला. ज्योती चार बहिणींमध्ये सर्वात लहान होत्या. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याच्या आईने त्याला अनाथाश्रमात पाठवले. पण ज्योती लहानपणापासूनच हुशार होत्या. आपल्या मेहनतीने दहावी पास झाल्या. ज्योती घरी परतल्यावर वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचं लग्न लावून दिलं. वयाच्या 18 व्या वर्षी ज्योती यांना दोन मुलं झाली. सासरच्या घरातही दु:ख काही कमी नव्हते.
आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ज्योतीने आपल्याच गावातील शेतात काम करण्यास सुरुवात केली. यासाठी ज्योतीला रोज पाच रुपये मिळायचे. ज्याच्या मदतीने त्या आपल्या मुलांचं पोट भरायच्या. ज्योती यांनी अभ्यासही सुरू केला. ज्योती रेड्डी यांनी 1992 मध्ये बीए पूर्ण केले. यानंतर त्यांना एका शाळेत नोकरी लागली. यानंतर विद्यापीठातून बीएड पदवी मिळवली. यानंतर ज्योती शिक्षिका झाल्या. दरम्यान, ज्योती रेड्डी यांचे नातेवाईक 2000 साली गावी आले, ते अमेरिकेत राहत होते.
नातेवाईकांशी बोलून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी दोन्ही मुलांना मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत पोहोचल्यानंतर ज्योती गुजराती कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागल्या. ज्योती यांनी एका कंपनीत रिक्रूटर म्हणूनही काम केले. 2001 मध्ये फोनिक्स, USA येथे तिच्या चार हजार डॉलरच्या बचतीतून कंसल्टिंग सुरू केलं.
ज्योती यांनी मेहनत घेतली आणि कंपनी तिथे चालू लागली. यानंतर ज्योती यांनी सॉफ्टवेअर सोल्यूशन नावाने कंपनी सुरू केली. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. मोठ्या कंपन्यांना ते आयटी सपोर्ट देत आहे. ज्योती स्वतः या कंपनीच्या सीईओ आहेत. आज त्यांच्या कंपनीच्या शाखा अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आहेत. कंपनी वर्षाला करोडो रुपये कमावते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"