शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

देशातील महाविद्यालयांमध्ये दीड लाख बोगस प्राध्यापक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 6:00 AM

काही महाविद्यालयांमध्ये आणखी प्राध्यापक नियमबाह्य पद्धतीने कार्यरत

ठळक मुद्दे सुमारे १७ लाखांपर्यत वाढलेली अभियांत्रिकीची प्रवेशक्षमता १४ लाख ५० हजारांपर्यत कमीकाही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त

पुणे : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केलेल्या तपासणीत सुमारे दीड लाख प्राध्यापक बोगस असल्याचे आढळून आले असून, काही महाविद्यालयांमध्ये आणखी प्राध्यापक नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असण्याची शक्यता आहे. परंतु, लवकरच त्यांचीही तपासणी केली जाईल, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी सांगितले.सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. सहस्त्रबुद्धे बोलत होते. ते म्हणाले, की ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) सलग तीन वर्ष कमी प्रवेश झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणली आहे. सुमारे १७ लाखांपर्यत वाढलेली अभियांत्रिकीची प्रवेशक्षमता १४ लाख ५० हजारांपर्यत कमी झाली आहे. पुढील काळात ही प्रवेशक्षमता १४ लाखांपर्यत आणण्याचे नियोजन आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे महाविद्यालयांनी प्राध्यापकांची संख्याही कमी केली आहे. तसेच, काही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे.डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, की अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थी व प्राध्यापकांची खोटी माहिती एआयसीटीईला दिली होती. प्राध्यापकांच्या माहितीची पडताळणी पॅनकार्ड आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे केल्यानंतर सुमारे साडेसहा लाख प्राध्यापकांपैकी दीड लाख प्राध्यापक बोगस निघाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी शोधणारे विद्यार्थी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी यांच्यामध्ये ताळमेळ ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एआयसीटीईकडून नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांबरोबरच औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना मान्यता दिली जात नाही.देशातील औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांकडून संबंधित विद्याशाखांचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव येत आहे. परंतु, नव्या महाविद्यालयांना मान्यता दिल्यास या विद्याशाखांची परिस्थिती अभियांत्रिकी विद्याशाखेसारखी होऊ शकते, असेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.        

टॅग्स :PuneपुणेProfessorप्राध्यापकcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी