Rahul Gandhi : केंद्रातील मोदी सरकारने येत्या 18-22 सप्टेंबरदरम्यान एक विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 'एक देश-एक निवडणूक', याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट लिहून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल यांनी लिहिले की, “भारत हा राज्यांचा संघ आहे. 'एक देश-एक निवडणूक' ही कल्पना संघ आणि सर्व राज्यांवरील हल्ला आहे." अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेसचा हल्लाबोलयापूर्वी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी 'एक देश, एक निवडणूक' यावरुन भाजपवर टीका केली. चिदंबरम म्हणाले की, 'भाजपने पुरस्कृत केलेल्या इतर मुद्द्यांप्रमाणे ही कल्पनादेखील पूर्वनियोजित असल्याचे दिसते. एक देश-एक निवडणूक हा राजकीय-कायदेशीर प्रश्न आहे. हे कायद्यापेक्षा राजकीय आहे. 8 सदस्यीय समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षाचा एकच सदस्य आहे, याशिवाय समितीमध्ये घटनात्मक बाबींची जाण असलेला एकच स्वीकृत वकील आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'सरकारने एक राष्ट्र-एक देश यासाठी स्थापन केलेली समिती संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना समितीचे सदस्य न करणे, आमच्या समजण्यापलीकडचे आहे. केसी वेणुगोपाल यांनी आरोप केला की, खर्गे यांना समितीत ठेवण्यात आले नाही, कारण त्यांना ठेवणे भाजप आणि आरएसएससाठी सोयीचे नाही.