नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत अराजक, अनागोंदी, जुलूमशाहीचे दर्शन साºया देशाला झाले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या शंभर दिवसांत देशात काहीच विकास झाला नसून त्यानिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारचे उपरोधिक शैलीत अभिनंदन केले आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या शंभर दिवसांत देशाला आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे ही वस्तुस्थिती मोदी सरकारने आतातरी मान्य करावी.
वाहननिर्मिती उद्योग कधी नव्हे इतका संकटात सापडला आहे. असे प्रश्न उभे राहूनही भारताची अर्थव्यवस्था चीन, अमेरिकेपेक्षा उत्तम कामगिरी करीत असल्याचे ढोल मोदी सरकार बडवत आहे. गेल्या वर्षीपासून देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापन व दुर्लक्षामुळेच ही स्थिती ओढवली आहे. उद्योजक, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत केलेल्या विश्लेषणाची भाजपने खिल्ली उडवली. देशातील आठ क्षेत्रांचा विकासदर २ टक्क्यांहून कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास देशात आर्थिक मंदी नक्की येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव सध्या देशाला जाणवत आहे. आपल्यावर टीका करणाºया प्रसारमाध्यमांवर जरब बसविणे, लोकशाहीचे खच्चीकरण करणे ही मोदी सरकारची दुसºया कार्यकाळातील शंभर दिवसांची कामगिरी आहे.
हा तर कामगारांचा अपमान : प्रियांकामोदींच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचे साजरे होणारे सोहळे हा सध्या बिकट स्थितीत सापडलेल्या वाहननिर्मिती, वाहतूक, खाणक्षेत्रातील कामगारांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, आपले भवितव्य अंध:कारमय होत असल्याचे कामगारांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे.