- सुशांत मोरे, मुंबईदेशभरात गेल्या अकरा महिन्यांत रेल्वे अपघातांनी शंभरी गाठली आहे. नोव्हेंबर २0१४ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीत घडलेल्या या अपघातांमध्ये ४७ वेळा रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे तर मानवविरहित फाटकांजवळ ३६ अपघातांच्या घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.हे अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्पात तरतुद केली जाते आणि अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा करण्यात येते. असे असले तरी अपघातांचे प्रमाण फार कमी होताना दिसत नाही. रेल्वे रुळावरुन घसरणे किंवा रेल्वे रुळाला तडा सारख्या घटनांचा शोध घेणारी यंत्रणा रेल्वेकडून आणण्यात येणार आहे आणि रेल्वेच्या डब्यांसाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणेची चाचणी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या चाचण्यांनंतरही रेल्वेने अजूनही निर्णय घेतलेला नाही. नोव्हेंबर २0१३ ते सप्टेंबर २0१४ मध्ये एकूण १३३ अपघातांच्या घटना घडल्या होत्या. रेल्वेकडून केलेल्या उपाययोजना आणि दावामानवविरहीत फाटकांजवळ अपघात होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित. आयआयटी कानपूरचा हातभारसुरक्षा माहिती व्यवस्थापन यंत्रणा मंजूरआग आणि धुरावरील नियंत्रणासाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणा च्पॅन्ट्री कार आणि पॉवर कारसाठी फायर सस्पेन्शन यंत्रणारेल्वेकडून केलेल्या उपाययोजना आणि दावामानवविरहीत फाटकांजवळ अपघात होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित. आयआयटी कानपूरचा हातभारसुरक्षा माहिती व्यवस्थापन यंत्रणा मंजूरआग आणि धुरावरील नियंत्रणासाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणा पॅन्ट्री कार आणि पॉवर कारसाठी फायर सस्पेन्शन यंत्रणाअपघाताचा प्रकारघटना घटना (नोव्हें २0१४(नोव्हें २0१३-सप्टें २0१५)सप्टें २0१४)ट्रेनची धडक0१0४रुळावरुन घसरणे४७६२आग लागणे0३0५फाटकाजवळ 0६0७मानवरहित फाटकाजवळील ३६५१किरकोळ 0७0४एकूण१00१३३
अकरा महिन्यांत शंभर रेल्वे अपघात
By admin | Published: November 06, 2015 2:10 AM