बेळगावात क्लोरीन सिलिंंडरच्या स्फोटात एक ठार, १० जखमी
By admin | Published: February 17, 2016 2:00 AM
बेळगाव : रिक्षातून नेताना क्लोरीनच्या सिलिंंडरचा स्फोट झाल्यामुळे एक जण जागीच ठार झाला. तर, दहा जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. क्लोरीनच्या तीव्र वासामुळे अन्य १२ जणांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. स्फोटात पाच दुचाकी, एक कार आणि दोन रिक्षा यांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी दीडच्या दरम्यान भातकांडे स्कूलजवळ घडली.
बेळगाव : रिक्षातून नेताना क्लोरीनच्या सिलिंंडरचा स्फोट झाल्यामुळे एक जण जागीच ठार झाला. तर, दहा जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. क्लोरीनच्या तीव्र वासामुळे अन्य १२ जणांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. स्फोटात पाच दुचाकी, एक कार आणि दोन रिक्षा यांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी दीडच्या दरम्यान भातकांडे स्कूलजवळ घडली.]]]]]]]]]]]]]]होनगा येथून मालवाहू रिक्षातून क्लोरीनने भरलेले सिलिंडर उद्यमबाग येथे नेण्यात येत होते. चालकाने भातकांडे स्कूल परिसरातील आपल्या घरासमोर रिक्षा उभी केली होती. त्यावेळी रिक्षातील सिलिंंडरचा अचानक स्फोट झाला आणि परिसर दणाणून गेला. याचवेळी तेथून मोटारसायकलवरून जाणारे राजेंद्र पाटील यांचा या स्फोटात मृत्यू झाला. काहीजणांच्या अंगात काचा आणि पत्र्याचे तुकडे घुसले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटानंतर वायूगळती झाल्याने अनेक लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. (प्रतिनिधी) -------रिक्षाचालक फरारस्फोट झाल्यानंतर रिक्षाचालक फरार झाला असून, वाहनाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिलिंडरमधील रसायन क्लोरीन होते. उन्हात जास्त वेळ रिक्षा थांबल्याने हा स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.