उत्तराखंडमध्ये २६ दिवसांत तयार झाला एक किमीचा बोगदा; ४२०० कोटींचा प्रकल्प, २०२४ मध्ये होणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:58 AM2022-04-20T11:58:33+5:302022-04-20T11:59:34+5:30

या रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश आणि कर्णप्रयाग यांच्यातील अंतर ७ तासांनी कमी होऊन केवळ २ तास होणार आहे.

One km tunnel completed in 26 days in Uttarakhand, Rs 4200 crore project to be completed in 2024 | उत्तराखंडमध्ये २६ दिवसांत तयार झाला एक किमीचा बोगदा; ४२०० कोटींचा प्रकल्प, २०२४ मध्ये होणार पूर्ण 

उत्तराखंडमध्ये २६ दिवसांत तयार झाला एक किमीचा बोगदा; ४२०० कोटींचा प्रकल्प, २०२४ मध्ये होणार पूर्ण 

Next

डेहराडून : देवभूमी उत्तराखंडमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या (आरव्हीएनएल) रेल्वे प्रोजेक्ट २ अंतर्गत ऋषिकेशपासून ते कर्णप्रयागपर्यंत रेल्वे लाइनच्या कामाने वेग घेतला आहे. ४२०० कोटींच्या या प्रकल्पात शिवपुरी ते ब्यासीपर्यंत एक किमी बोगद्याचे काम केवळ २६ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. इतक्या कमी वेळात बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा नवा विक्रम झाला आहे. 

या रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश आणि कर्णप्रयाग यांच्यातील अंतर ७ तासांनी कमी होऊन केवळ २ तास होणार आहे. १२५ किमीची ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योजनेत रेल्वे लाइनवर १२ नवे रेल्वे स्टेशन, १७ बोगदे असणार आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. 

या जिल्ह्यांना जोडणार 
१२५ किमीच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गौचर, डेहराडून, टिहरी गढवाल, पौडी गढवाल, चमोली आणि कर्णप्रयाग जिल्ह्यांना जोडता येणार आहे
 

Web Title: One km tunnel completed in 26 days in Uttarakhand, Rs 4200 crore project to be completed in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.