नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी कृषि पायाभूत सुविधा निधीअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांची सुविधा सुरु करणार आहेत. याबरोबरच पीएम किसान योजनेअंतर्गत ८.५ कोटी शेतकºयांना १७००० कोटी रुपयांची सहाव्या टप्प्यातील रक्कम जारी करणार आहेत.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाºया या कार्यक्रमासाठी देशातील लाखो शेतकरी, सहकारी समित्या आणि सामान्य नागरिक सहभागी होतील. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. कॅबिनेटने गत महिन्यातच एक लाख कोटी रुपयांच्या कृषि पायाभूत सुविधा निधीला मंजुरी दिली होती. यानुसार, पायाभूत सुविधांसाठी स्वस्त कर्ज देण्यात येतील. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. कृषि पायाभूत सुविधा निधी हा पंतप्रधानांच्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजचाच एक भाग आहे.१ डिसेंबर २०१८ ला सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत ९.९ कोटींपेक्षा अधिक शेतकºयांना ७५ हजार कोटींपेक्षा अधिक नगदी लाभ देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटींच्या सुविधा निधीचा आज शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:47 AM