- धीरेंद्र जैन, जयपूर
केंद्र सरकारच्या मदतीने राजस्थानात एक लाख कोटींच्या रस्त्यांची निर्मिती करीत नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत केली.स्वातंत्र्यानंतर डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात जेवढे महामार्ग बनले तेवढ्याच लांबीचे महामार्ग या पाच वर्षांच्या काळात बनतील, असे त्यांनी सीकर जिल्ह्णातील जुुलियासरच्या लक्ष्मणगढ येथे तसेच दौसा येथे विशाल जाहीरसभेत नमूद केले. त्यांनी २७४६ कोटींच्या पाच महामार्ग प्रकल्पाचा शिलान्यास केला.सालासर येथे १२०० कोटींचे विकासकार्य....गडकरी आणि वसुंधरा राजे यांनी १२०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला. राष्ट्रीय महामार्ग ६५ च्या निर्मितीवर ६३७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून या दोघांनी ११९.६ किलोमीटर लांब सालासर-नागौर तसेच नागौर-जायल- डीडवाना- सालासर- लक्ष्मणगढ- मुकुंदगड या १९६ किमी मार्गाचा शिलान्यासही केला, तसेच चुरूजवळील साहवा येथील राजकीय सामुदायिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले.सालासर बालाजी यांचा आशीर्वादगडकरी आणि वसुंधरा राजे यांनी प्रसिद्ध सालासर धाम येथे बालाजींचे दर्शन घेतले. तेथे नारळ बांधून राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी साकडे घातले.रस्त्यावर उतरणार विमानभारतमाला प्रकल्पांतर्गत राजस्थानच्या सीमा भागात तीन ठिकाणी एअर स्ट्रीप म्हणून वापर होईल असे महामार्ग तयार केले जाणार असून तेथे विमान उतरविणे शक्य होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.समुद्राच्या पाण्याने भागवणार तहानराजस्थानातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल स्वावलंबन मोहीम राबविली जात आहे. त्यातून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवत राज्याची तहान भागविली जाईल, असे मुख्यमंत्री राजे यांनी स्पष्ट केले.जयपूर-दिल्ली एक्स्प्रेसचे काम याच वर्षीदिल्ली- जयपूर राष्ट्रीय महामार्ग एक्स्प्रेस-वेच्या रूपाने विकसित करण्याचे काम याच वर्षी सुरू होणार असून त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च होईल. जर्मनीच्या धर्तीवरील या महामार्गामुळे दिल्ली- जयपूर अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येईल. डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात ७४९८ किमी. राष्ट्रीय महामार्ग होते. या राज्यात सुमारे ७ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनविले जाणार आहेत.