इंदौर - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात चीनी वस्तूंच्या बहिष्काराचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा दिली आहे. यामुळे मोठ्या संख्येने सामान्य नागरिकही चीनी वस्तूंकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये चीनवरून येणाऱ्या वस्तूंच्या बहिष्काराची भावना अधिक तीव्र होत असल्याचा दावा करत, इंदौर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदर शंकर लालवानी यांनी एक लाख स्वदेशी राख्या तयार करण्याचा संकल्प केला. आपण रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खासगी संघठनांकडून एक लाख स्वदेशी राख्या तयार करून घेत आहोत, अशी माहिती लालवानी यांनी शनिवारी दिली.
22 खासगी संघटनांशी संबंधित महिला तयार करणार एक लाख राख्या -लालवानी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनावण्याचे आव्हान केल्यानतंर, आपण शहरातील 22 खासगी संघटनांशी संबंधित महिलांच्या मदतीने एक लाख स्वदेशी राख्या तयार कत आहोत. जेणे करून स्थानिक बाजारातील चिनी राख्यांना आव्हान देता येईल."
वेगवेगळ्या चिनी वस्तूंना किफायतशीर पर्याय निर्माण करण्यास देशातील उद्योजकांना काही वेळ लागेल. मात्र, स्थानिक ग्राहकांच्या मनात चीनी वस्तूंविरोधातील भावना अधिक तीव्र होत आहे, असे लालवानी म्हणाले. तसेच, स्वदेशी राख्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केंद्र तयार केले जातील. या राख्या ऑनलाईन विकण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विक्रीतून मिळणारे पैसे, राख्या तयार करणाऱ्या खासगी संघटनांना दिले जातील, असेही लालवानी म्हणाले.
पंतप्रधान अन् 'त्या' वीर भारतीय जवानांसाठीही राख्या - या खासगी संघटनांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ विशेष राखीदेखील तयार केली आहे. तर काही राख्या, गेल्या महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत हौतात्म्य आलेल्या भारतीय लष्कराच्या 20 वीर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठीही तयार करण्यात आल्या आहेत, असेही लालवानी यांनी सांगितले. यावेळी 3 ऑगस्टला रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर