शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

प्लास्टिकचा वापर करून बनविले एक लाख किलोमीटरचे पक्के रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, रस्त्याच्या खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 3:49 AM

डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे.

नवी दिल्ली : प्लास्टिकच्या कच-याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अनोखा मार्ग शोधून काढला आहे. प्लास्टिकपासून चक्क पक्के रस्ते बनविण्यात येत असून, आतापर्यंत असे एक लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात आले आहेत. याद्वारे दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक म्हणजे प्लास्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणारा एक उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. दुसरे म्हणजे, रस्ते बांधण्याच्या खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे.डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी  वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांच्या बांधकामाच्या खर्चातही मोठी बचत होत आहे. रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २0१६ मध्ये केली होती. आतापर्यंत ११ राज्यांतील एक लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांत प्लास्टिक वापरले गेले आहे. गुरुग्रामच्या महापालिकेने २0१८ मध्ये पहिल्यांदा रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर केला. आसामने यंदाच प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. २७0 कि.मी. लांबीच्या जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महार्गासाठी प्लास्टिकचा वापर केला गेला आहे. दिल्ली-मेरठच्या दोन कि.मी. पट्ट्यासाठी १.६ टन प्लास्टिक वापरले गेले. दिल्ली विमानतळाला जोडणाºया धौला कुँवा रस्त्याच्या बांधकामातही प्लास्टिक वापरले.दररोज तयार होतो २५,९४0 टन प्लास्टिक कचराभारतात दररोज २५,९४0 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४,३00 हत्तींच्या वजनाएवढा आहे. यातील ६0 टक्के कचरा रिसायकल होतो. बाकीचा जमिनीवरच पडून राहतो. हाच कचरा मग ड्रेनेज तुंबवतो, मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात समुद्रात जातो. काही कचरा जाळला जातो. त्यातून वायुप्रदूषण होते.रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे प्लास्टिक कचºयाची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर आणखी वाढल्यास ही समस्या कमी होईल.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकIndiaभारत