नवी दिल्ली : जगभरात कोरोना (कोविड-१९) बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी, कोरोनाला परताविणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्यांमधे अगदी सोळा दिवसांच्या नवजात अर्भकापासून ते नव्वदीवरील ज्येष्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाला परतावून लावले आहे. बाधितांपैकी जवळपास ९७ टक्के रुग्णांमधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२ लाखांवर गेली असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. जवळपास २ लाख २८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनातून बरे होणा-या रुग्णांच्या संख्याही मोठी आहे.अमेरिकेत बाधितांची संख्या दहा लाखांवर गेली असली, तरी तेथील बरे होणाºया रुग्णांची संख्या तब्बल १ लाख ४७ हजार आहे. तर, सव्वादोन लाखांहून अधिक रुग्ण असलेल्या स्पेनमधील सव्वा लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. इटली ७१ हजार आणि फ्रान्समधील पन्नास हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीतील एक लाख ६० हजारांपैकी १ लाख २० हजार रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीमधे बरे होणाºया रुग्णांचा आकडा अधिक दिलासा देणारा आहे. कोरोनाचा उद्रेक झालेल्या चीनमधे अवघ्या ६४७ कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. त्यामुळे तेथील लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. तसेच, कोरोनावर विजय मिळविल्याचा दावादेखील चीनने केला आहे.>बाधितांपैकी ९७ टक्के रुग्णांची स्थिती मध्यम स्वरूपाची : बाधितांपैकी तब्बल १९ लाख ९१ हजार ६३० रुग्णांची (९७ टक्के) स्थिती ही मध्यम स्वरूपाची आहे. हे रुग्ण औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्यांच्यामधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. बाधितांपैकी ५९ हजार ८११ रुग्ण (३ टक्के) अत्यवस्थ आहेत.
जगभरातील प्रमुख बाधित देशांतील स्थितीदेश बाधितांची संख्या बरे झालेले रुग्णअमेरिका १०,६४,१९४ १,४७,४११स्पेन २,३६,८९९ १,३२,९२९इटली २,०३,५९१ ७१,२५२फ्रान्स १,६६,४२० ४८,२२८ब्रिटन ६५,२२१ -----जर्मनी १,६१,५३९ १,२०,४००तुर्की १,१७,५८९ ४४,०४०रशिया ९९,३९९ १०,२८६इराण ९३,६५७ ७३,७९१चीन ८२,८५८ ७७,५७८जगातील ३२,१८,१८४ १०,००,०३३बाधित