शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

‘जीएसटी’ लागू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल

By admin | Published: September 01, 2016 6:38 AM

तंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी करसुधारणा म्हणून ओळखला जाणारा व संपूर्ण देशात एकसमान दराने आकारला जाणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याच्या दिशेने बुधवारी आणखी

नवी दिल्ली : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी करसुधारणा म्हणून ओळखला जाणारा व संपूर्ण देशात एकसमान दराने आकारला जाणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याच्या दिशेने बुधवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला गेला. ही नवी करप्रणाली लागू करण्यासाठी संसदेने केलेल्या १२२ व्या घटनादुरुस्तीस गोवा विधानसभेने एकमताने अनुमोदन दिले. असे अनुमोदन देणारे गोवा हे १५ वे राज्य ठरले. अशा प्रकारे भारतीय संघराज्यातील निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळांचे अनुमोदन मिळाल्याने ही ऐतिहासिक घटनादुरुस्ती प्रत्यक्ष लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘जीएसटी’साठीचे मूळ घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने ६ मे रोजी मंजूर केले होते. राज्यसभेने त्यात काही दुरुस्त्या सुचवून ते ३ आॅगस्ट रोजी लोकसभेकडे परत पाठविले. या दुरुस्त्याही लोकसभेने ८ आॅगस्ट रोजी मंजूर केल्या. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत या घटनादुरुस्तीस निम्म्याहून अधिक राज्यांचे अनुमोदन घेण्याची औपचारिकता पूर्ण झाली.आता हे विधेयक संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाईल. त्यांच्या संमतीनंतर सरकार ज्या दिवशी राजपत्रात अधिसूचना काढेल त्या दिवसापासून राज्यघटनेतील ही दुरुस्ती अधिकृतपणे लागू होईल व वस्तू आणि सेवा या दोन्हींवर कर आकारणी करण्याचा अधिकार केंद्र व राज्ये यांना प्राप्त होईल.