'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:31 PM2024-09-18T18:31:38+5:302024-09-18T18:32:37+5:30
One Nation One Election : केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
One Nation One Election : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला बुधवारी(दि.18) मंजुरी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे, तसेच निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक खर्च कमी करणे, हा या मागचा उद्देश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. पण, विरोधी पक्षनेत्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याच्या व्यावहारिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
One Nation, One Election cannot work in a democracy, we don't stand by it: Mallikarjun Kharge
— ANI Digital (@ani_digital) September 18, 2024
Read @ANI Story | https://t.co/HvMjmUq3Nx#ONOE#Congress#MallikarjunKhargepic.twitter.com/eh9sZLiUbv
'वन नेशन-वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला विरोध करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हे व्यावहारिक नाही. निवडणुका आल्या की, लक्ष वळवण्यासाठी भाजपवाले असे मुद्दे उपस्थित करतात. हा केवळ भाजपचे लक्ष विचलित करण्यासाठीचा एक मुद्दा आहे. हे लोकशाहीच्या आणि संघराज्याच्या विरोधात आहे. देश याला कधीही मान्य करणार नाही. दरम्यान, खर्गे यांच्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'वन नेशन वन इलेक्शन'बाबत विरोधकांना अंतर्गत दबाव जाणवू शकतो, कारण 80 टक्क्यांहून अधिक लोकांनी विशेषत: तरुणांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
#WATCH | Hyderabad | On One Nation One Election, AIMIM chief Asaduddin Owaisi says, "...You can't do things based on your convenience. The constitution will function based on constitutional principles. It has always been the ideology of BJP and RSS - they don't want regional… pic.twitter.com/U6EuCfE7K9
— ANI (@ANI) September 18, 2024
मी नेहमीच विरोध केला: ओवेसी
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, माझा नेहमीच 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध आहे. हा संघवाद नष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकशाहीशी तडजोड होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा वगळता इतर कोणालाही स्वतंत्र निवडणुकांबाबत कोणतीही अडचण नाही. वारंवार आणि नियतकालिक निवडणुकांमुळे लोकशाही उत्तरदायित्व सुधारते.
भाजपची आणखी एक स्वस्त खेळी: डेरेक ओब्रायन
राज्यसभा खासदार आणि टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'ला लोकशाहीविरोधी भाजपची आणखी एक स्वस्त खेळी म्हटले. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका का जाहीर झाल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. तसेच, तुम्ही एकाच वेळी तीन राज्यांत निवडणुका घेऊ शकत नाही आणि तुम्ही वन नेशन वन इलेक्शनची चर्चा करता, अशी टीकाही त्यांनी केली.
मत लुटारूंची राजवट चालणार नाही : जीतनराम मांझी
भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग असलेले HAM प्रमुख जीतन राम मांझी यांनी 'वन नेशन-वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका होतात, या निवडणुकांच्या सातत्यामुळे देश नेहमीच निवडणुकीच्या स्थितीत असतो. याचा परिणाम केवळ प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णयांवर होत नाही तर देशाच्या तिजोरीवरही मोठा भार पडतो. 'वन नेशन-वन इलेक्शन' दलित मतदारांनाही सुविधा देईल. आता मत लुटणाऱ्यांची राजवट चालणार नाही.
आमची भूमिका सकारात्मक आहे-मायावती
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, या प्रणालीअंतर्गत देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबत आमच्या पक्षाची भूमिका सकारात्मक आहे, पण त्याचे उद्दिष्ट देश आणि जनतेच्या हिताचे असले पाहिजे.