शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 6:31 PM

One Nation One Election : केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

One Nation One Election : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला बुधवारी(दि.18) मंजुरी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे, तसेच निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक खर्च कमी करणे, हा या मागचा उद्देश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. पण, विरोधी पक्षनेत्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याच्या व्यावहारिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

'वन नेशन-वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला विरोध करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हे व्यावहारिक नाही. निवडणुका आल्या की, लक्ष वळवण्यासाठी भाजपवाले असे मुद्दे उपस्थित करतात. हा केवळ भाजपचे लक्ष विचलित करण्यासाठीचा एक मुद्दा आहे. हे लोकशाहीच्या आणि संघराज्याच्या विरोधात आहे. देश याला कधीही मान्य करणार नाही. दरम्यान, खर्गे यांच्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'वन नेशन वन इलेक्शन'बाबत विरोधकांना अंतर्गत दबाव जाणवू शकतो, कारण 80 टक्क्यांहून अधिक लोकांनी विशेषत: तरुणांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. 

मी नेहमीच विरोध केला: ओवेसीएआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, माझा नेहमीच 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध आहे. हा संघवाद नष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकशाहीशी तडजोड होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा वगळता इतर कोणालाही स्वतंत्र निवडणुकांबाबत कोणतीही अडचण नाही. वारंवार आणि नियतकालिक निवडणुकांमुळे लोकशाही उत्तरदायित्व सुधारते.

भाजपची आणखी एक स्वस्त खेळी: डेरेक ओब्रायनराज्यसभा खासदार आणि टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'ला लोकशाहीविरोधी भाजपची आणखी एक स्वस्त खेळी म्हटले. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका का जाहीर झाल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. तसेच, तुम्ही एकाच वेळी तीन राज्यांत निवडणुका घेऊ शकत नाही आणि तुम्ही वन नेशन वन इलेक्शनची चर्चा करता, अशी टीकाही त्यांनी केली. 

मत लुटारूंची राजवट चालणार नाही : जीतनराम मांझीभाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग असलेले HAM प्रमुख जीतन राम मांझी यांनी 'वन नेशन-वन इलेक्शन'च्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका होतात, या निवडणुकांच्या सातत्यामुळे देश नेहमीच निवडणुकीच्या स्थितीत असतो. याचा परिणाम केवळ प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णयांवर होत नाही तर देशाच्या तिजोरीवरही मोठा भार पडतो. 'वन नेशन-वन इलेक्शन' दलित मतदारांनाही सुविधा देईल. आता मत लुटणाऱ्यांची राजवट चालणार नाही.

आमची भूमिका सकारात्मक आहे-मायावती 'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, या प्रणालीअंतर्गत देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबत आमच्या पक्षाची भूमिका सकारात्मक आहे, पण त्याचे उद्दिष्ट देश आणि जनतेच्या हिताचे असले पाहिजे.

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी