Cyber Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून सायबर गुन्ह्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. या गुन्ह्यात दोन तरुणांचा सहभाग आहे, यातील एक एमबीए तर दुसरा इंजिनीअर आहे. या दोघांनी एका खोलीत बसून सायबर फसवणुकीचे असे जाळे विणले, जे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. बंगळुरतील येलहंका भागातील एका घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि पलंगाखाली लपवलेले 854 कोटी रुपये जप्त केले.
मनोज श्रीनिवास(MBA, 33 वर्षे) आणि फणींद्र(सॉफ्टवेअर इंजिनिअर, 36 वर्षे), या सायबर फसवणुकीतील दोन तरुणांची नावे आहेत. या दोघांनी बिना नावाची एक कंपनी उघडली आणि कंपनीत दोन तरुणांना कामावर ठेवले. त्यांना 8 मोबाईल फोन रात्रंदिवस सुरू ठेवण्याचे काम दिले होते. सप्टेंबरमध्ये बंगळुरू सायबर क्राईम पोलिसांनी मनोज आणि फणींद्र यांच्यासह 6 जणांना अटक केली.
तरुणीने फसवणुकीची तक्रार दाखल केली एका 26 वर्षीय तरुणीने पोलिसांत साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. कमी गुंतवणुकीच्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष तिला दाखवण्यात आले होते. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान हे फसवणुकीचे जाळे भाड्याच्या घरातून चालवले जात असल्याचे समोर आले. श्रीनिवास आणि फणींद्र, सोशल मीडियाद्वारे लोकांची फसवणूक करायचे. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून हे दोघेही लोकांना फसवत असे. या दोघांनी आतापर्यंत हजारो लोकांना आपले बळी बनवले होते.
2 वर्षांत 854 कोटी रुपयांचे व्यवहार बंगळुरूमधील सायबर क्राईम पोलिसांनी त्यांच्या नेटवर्कचा तपास केला तेव्हा त्यांना कळले की, गेल्या दोन वर्षांत या लोकांनी 84 बँक खात्यांद्वारे 854 कोटी रुपयांचे व्यवहार केला आहे. सप्टेंबरमध्ये पोलिसांनी बँक खाती शोधून गोठवली. यादरम्यान बँक खात्यात फक्त 5 कोटी रुपये शिल्लक होते, तर 854 कोटी रुपये गेमिंग अॅप्स, USDT सारख्या क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन कॅसिनोसह अनेक ठिकाणी ट्रांसफर केले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचे मुख्य नेटवर्क दुबईतून कार्यरत होते. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.