श्रीनगर - पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी हाजीपीर आणि उरी विभागात जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य करून गोळीबार केला. दरम्यान, उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने रहिवासी भागांना लक्ष्य करून गन आणि मोर्टारचा मारा केला, अशी माहिती लष्करामधील सुत्रांनी दिली. तसेच शाहपूर आणि किरनी विभागातही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला.