शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
2
नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई!
3
'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...
4
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?
5
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ११ व्या क्रमांकावर; जयंत पाटलांनी सांगितली कशी झाली वाताहात
6
IND vs AUS : पर्थ स्टेडियम 'लॉकडाउन'; इथं टीम इंडियानं लावलाय सीक्रेट ट्रेनिंग कॅम्प
7
Video: धक्कादायक! पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी; व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी; औसा हेलिपॅडवर अधिकाऱ्यांनी केली तपासणी
9
'किंगमेकर' की 'किंग'? अजितदादांच्या मनात चाललंय काय?... तीन शक्यता, तीन संधी
10
"अरे... आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही...!"; बाळासाहेबांचं नाव घेत फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
11
पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे
12
'काँग्रेसने तुम्हाला फक्त रक्तरंजित खेळ दिला, त्यांच्यापासून सावध राहा', PM मोदींचा हल्लाबोल
13
हृदयस्पर्शी! पैसे नसताना भाजीवाल्याने फुकट दिलेली भाजी; १४ वर्षांनी DSP झाल्यावर घेतली भेट
14
Swiggy IPO Listing Date : Swiggy IPO चं अलॉटमेंट स्टेटस झालं जाहीर, ग्रे मार्केटमध्ये काय संकेत? उद्या लिस्टिंग
15
उद्धव ठाकरेंना सिंधुदुर्गात येण्यापूर्वीच दीपक केसरकरांनी दिला धक्का, ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी फोडला
16
ठाकरेंचा उमेदवार पाडण्यासाठी काँग्रेसची खेळी; बंडखोर उमेदवाराचा उघडपणे प्रचार
17
...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा
18
करोडोच्या हिऱ्यांसाठी कतारचे दोन राजघराणे समोरासमोर, लंडन हायकोर्टात पोहोचले प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण वाद
19
बापरे! एन्ट्रीच्या नावावर जमा केले पासबुक; लोकांच्या अकाऊंटमधून ५० लाख घेऊन पोस्टमास्तर फरार
20
शनी-बुधाचा दृष्टी योग: ३ राशींना बक्कळ लाभ, अपार यश; ३ राशींना कठीण काळ, संमिश्र फल!

एक हटवणार गुजरातची दारूबंदी, दुसरा मिशीवर ताव देऊन मागतोय मते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:47 PM

एक आहे सॉफ्टवेअर अभियंता, तर दुसरा निवृत्त लष्करी अधिकारी

यदु जोशी

गांधीनगर : गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मला आमदार करा, मी दारूबंदी हटवून दाखवतो, असे सांगत एक सॉफ्टवेअर डेव्हलपर निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरला आहे. त्याचे नाव नरेश प्रियदर्शी. तर मिशीवर ताव देत मगनभाई सोळंकी हे माजी लष्करी अधिकारीही मत मागत आहेत.

नरेश प्रियदर्शी यांची हिंमतही मोठी आहे. अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून त्याने दंड थोपटले आहेत ते थेट मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याविरोधात. भाजपसाठी अत्यंत सुरक्षित असा हा मतदारसंघ. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे होत नाही. दुसरीकडे शेकडो कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर राज्य सरकारला पाणी सोडावे लागते. विषारी किंवा निकृष्ट दारू पिऊन अनेक लोक दरवर्षी मरतात. मग अशी दारूबंदी काय कामाची? ती हटविलेलीच बरी असा नरेश यांचा आग्रह आहे. दारूची बाटली हे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून त्यांनी खूप  प्रयत्न केले. पण उपलब्ध अडीचशे चिन्हांमध्ये दारूची बाटली नव्हती.

दारूबंदी हटवू म्हणणारा हा आहे भाजप उमेदवारलाधू पारघी हे बनासकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. त्यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले की, ते निवडून आल्यानंतर ते दांतामधील दारूबंदी हटविल्याशिवाय राहणार नाहीत. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत तसेच मतदारांना लालूच दाखविल्याबद्दल कलम १७१ ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाजपच्या उलट गणतीचा काॅंग्रेसकडून डिजिटल बोर्डअहमदाबादच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर एक बोर्ड लावला आहे. राज्यातील भाजप सरकारचे दिवस भरले असल्याचा विश्वास त्यातून व्यक्त केला आहे. या डिजिटल बोर्डवर भाजप सरकार जायला किती दिवस, किती तास आणि किती मिनिटे बाकी आहेत याचे आकडे त्यावर बदलत राहतात. राजस्थानमधील गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत असाच डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता आणि त्यापूर्वी तेथे असलेले भाजपचे सरकार सत्तेतून गेले होते. 

मुछे हो तो मगनभाई जैसी...

५७ वर्षीय मगनभाई सोळंकी हे आगळेवेगळे उमेदवार अपक्ष म्हणून साबरकांठा जिल्ह्याच्या हिंमतनगर मतदारसंघात भाग्य अजमावित आहेत. त्यांची मिशी आहे अडीच फूट लांब. २०१२ मध्ये लष्करातून निवृत्त झाले. पिळदार, लांब मिशी ठेवण्याचा त्यांना छंद आहे. 

२०१७ मध्ये ते बहुजन समाज पार्टीकडून विधानसभा लढले, मग २०१९ मध्ये अपक्ष म्हणूनही लढले. आपण निवडून आलो तर लांब मिशा ठेवण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यावे असा आग्रह सरकारकडे धरू, असे त्यांनी  प्रचारादरम्यान लोकमतला सांगितले. या ठिकाणी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.

 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022