शिवपुरी:मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रामनगर गधई गावात एका पुलाच्या मुद्द्यावरुन पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. पुलावर पाईप टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध होता. यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन पोलिस उपनिरीक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पण, गावकऱ्यांनी दगडफेक करुनही पोलिसांनी कोणताही लाठीमार केला नसल्याचे राजेश सिंह चंदेल यांचे म्हणणे आहे.
काय प्रकरण आहे ?
करेरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अमित सिंह भदौरिया यांनी सांगितले की, करेरा येथील गधई गावात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे एका पुलावर पाइपलाइन टाकण्यावरुन ग्रामस्थ आणि रस्ता बांधकाम कंपनीमध्ये वाद झाला. याबाबत बांधकाम कंपनीच्या गुत्तेदाराने जिल्हाधिकार्यालयात अर्ज केला. यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले. पोलिस दल घटनास्थळी पाठवल्यानंतर काही गावकऱ्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केला, यात पोलिस उपनिरीक्षक राघवेंद्र यादव आणि इतर दोन पोलिस जखमी झाले.
मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता अडवलात्याचवेळी करेरा येथील काँग्रेसचे आमदार प्रगीलाल जाटव म्हणाले, 'मी गावकऱ्यांशी बोललो आहे. बांधकामाधीन रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या कल्व्हर्टवर पाईप टाकण्यास गावातील लोकांचा विरोध होता, त्याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. दरम्यान, जाटव आणि ग्रामस्थांनी एका वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून सरकारविरोधात रोष व्यक्त केला.