शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

एक वर्षाच्या मुलीच्या पोटात ३.५ किलो वजनाचा गर्भ!

By admin | Published: August 09, 2016 3:04 AM

एक वर्ष वयाच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढल्याची वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत विरळा मानली जाणारी घटना येथे घडली असून ३.५ किलो वजनाचा हा गर्भ शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर आता

कोईमतूर : एक वर्ष वयाच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढल्याची वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत विरळा मानली जाणारी घटना येथे घडली असून ३.५ किलो वजनाचा हा गर्भ शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर आता त्या मुलीची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे.शहराच्या मेत्तुपलयम भागातील श्री गणपती कृष्णा हॉस्पिटल या खासगी इस्पितळात बालरोग तज्ज्ञ व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणारे शल्यविशारद डॉ. डी. विजयगिरी यांनी शनिवारी ही शस्त्रक्रिया केली. गर्भासह या मुलीचे वजन आठ किलो होते. म्हणजेच जवळजवळ तिच्या वजाएवढाच गर्भ तिच्या पोटात वाढला होता. परिणामी तिचा रक्तपुरवठा व अन्नातून मिळणारी पोषणद्रव्ये गर्भाने शोषून घेतल्याने तिची वाढ खुंटली होती. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता ती चांगली बरी होत आहे.रोजंदारीवर मोलमजुरी करणाऱ्या राजू आणि सुमती या दाम्पत्याची ही मुलगी आहे. वर्षभरापूर्वी इरोडमधील गोबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचा जन्म झाला. जन्मत:च या मुलीचे पोट नेहमीपेक्षा मोठे होते. पालकांनी त्याकडे लक्ष दिले नाही व डॉक्टरांनीही वेळीच सीटी स्कॅन न केल्याने त्यांच्याही कदाचित लक्षात आले नाही. पण शेवटी या मुलीला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला, ती नीट जेवेनाशी झाली व पोटाचा आकार आणखीनच वाढला तेव्हा तिला एका खासगी डॉक्टरकडे नेले. कदाचित पोटात मांसाची गाठ किंवा ट्युमर असावा, असे वाटल्याने त्या डॉक्टरने पालकांना कोईमतूरला पाठविले.डॉ. विजयगिरी यांच्या सांगण्यानुसार त्यांनाही प्रथम ट्युमरचाच संशय आला. परंतु अल्ट्रासाऊंड स्कॅन काढल्यावर पोटात नुसता मांसाचा गोळा नसून त्यात अर्धवट विकसित झालेले अवयव, हाडे व पेशीसमूहही असल्याचे लक्षात आले. वैद्यकीय साहित्याचे संदर्भ घेतले असता या मुलीच्या पोटात कदाचित गर्भ वाढला असावा, अशी शंका बळावली. परंतु शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्यावरच त्याची नेमकी खात्री पटली.डॉ. विजयगिरी यांनी सांगितले की, एवढ्या लहान मुलीच्या पोटातून एवढा मोठा गोळा शस्त्रक्रियेने वेगळा काढणे सोपे नव्हते. डावे मूत्रपिंड या गर्भाला पूर्णपणे चिकटलेले होते. पित्ताशय, प्लीहा आणि स्वादूपिंडाचा डावा भागही या गोळ््याला चिकटलेला होता. गर्भामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळेही तयार झालेले होते व त्याच्या वाढीमुळे ओटीपोटातील अवयव दाबले गेलेले होते. अवयवांना इजा होऊ न देता आणि प्रत्येक रक्तवाहिनी अलगदपणे बाजूला करून हा गर्भाचा गोळा काढवा लागला. एकदा तो बाहेर काढल्यावर मोकळ््या झालेल्या जागेत इतर अवयव त्यांच्या योग्य जागी ठाकठीक केले गेले. (वृत्तसंस्था)