तेलंगणात काँग्रेसचा राडा; अर्थमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:18 PM2022-09-02T16:18:08+5:302022-09-02T16:19:00+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या, यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
हैदराबाद: तेलंगणात आज काँग्रेस आणि भाजप समर्थक आमनेसामने आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कामरेड्डी येथे पोहोचल्या होत्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतारामन यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर भाजप समर्थकांनी सीतारामन यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले आणि ताफा मार्गस्थ झाला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात दौऱ्यावर होत्या. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतारामन त्यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्त्येही तेथे आले आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी प्रकरण शांत केले. दरम्यान, कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथे निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) दुकानांना भेट दिली. यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांनी नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाबही विचारला.