शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

दिवाळीपूर्वी कांदा महागला, भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 5:29 PM

Onion Price Hike: नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वी काही ठिकाणी कांद्याची किंमत वाढून ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-एनसीआरसह वेगवेगळ्या शहरांमध्ये २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.

कांद्यांच्या वाढत्या दरांबाबत सरकारनं सांगितलं की, कांद्याची सरासरी किंमत वाढून ४७ रुपये किलो स्तरावर पोहोचला आहे. कांद्याच्या वाढत्या दरांपासून दिलासा देण्यासाठी बाजारामध्ये २५ रुपये किलो दराने बफर स्टॉकमधून विक्री वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक विषयक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कांद्याची देशभरातील सरासरी किंमत  ४७ रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याचा दर ३० रुपये प्रतिकिलो होती.

केंद्राच्या ग्राहक विषयक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही ऑगस्टपासून बफर स्टॉकमधून कांदा देत आहोत. यामुळे किमतीमधील वाढ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये किमतीत वाढ होत आहे तिथे घावूक आणि किरकोळ दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांदा दिला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून विविध ठिकाणी बफर स्टॉकमधून सुमारे १.७ लाख टन कांदा देण्यात आल आहे.

किरकोळ बाजारांमध्ये बफर स्टॉकमधील कांदा दोन सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेड यांच्या दुकानांमधून आणि वाहनांमधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दरामध्ये विकला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवामानासंबंधीची कारणं आणि खरीप हंगामात कांद्याचं उशिरा पीक घेतल्याने कमी उत्पादन झालं आहे. तसेच पीक बाजारात येण्यास उशीर होत आहे.   

टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारInflationमहागाई